


आष्टी
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी
महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या केंद्रीय युवा महोत्सव २०२३ - २०२४ मध्ये उत्कृष्ट
सादरीकरण करून रसिकांची दादा मिळवली. दि.४ ते ७ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान औरंगाबाद
येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात युवा महोत्सव संपन्न झाला.
यामध्ये धोंडे महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री अभिषेक विनोद शिरोळे-भजन,कु.पोकळे
सिद्धी संजय- पोवाडा,बहिरवाल सोपान भगवान-शास्त्रीय तालवाद्य,शिर्के
कृष्णा जगन्नाथ -मिमिक्री,वक्तृत्व,वादविवाद , भोसले शिवम नानच्या-लावणी,
पोटे अक्षय दत्तात्रय-काव्यवाचन,प्रश्नमंजुषा - साबळे सुरज दशरत,पोस्टर-कु.
पोटे श्वेता अशोक व-रांगोळी,चित्रकला,घोडके धीरज कैलास-स्पॉट फोटोग्राफी,शॉर्ट
फिल्म इत्यादी कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उपस्थित रसिकांची दाद
मिळवली.संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.डॉ.जी.पी.बोडखे,प्रा.डॉ.विनोद ढोबळे व
प्रा.डॉ.एस.बी.कुचेकर यांनी काम पाहिले. उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एच.जी.विधाते, उपप्राचार्य प्रा.डॉ.भास्कर
चव्हाण,उपप्राचार्य डॉ.संभाजी वाघुले , उपप्राचार्य डॉ.बी.एस.खैरे आणि
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कौतुक केले.
0 टिप्पण्या