आष्टी.
चीन येथे पार पडलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आष्टी तालुक्यातील मांडवा
गावचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे याने सुवर्ण कामगिरी करत एक
सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकवत इतिहास रचला.गोल्ड मेडल पटकवल्यानंतर पहिल्यांदाच तो
शनिवारी आपल्या जन्मगाव मांडवा गावात आल्यावर त्याची वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक
झाली.देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला संपुर्ण मांडवागाव व परिसरातील युवक डोक्यावर
घेऊन नाचला अविनाश साबळे यांंच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात
आली.मांडवा ग्रामस्थांसमोर साबळे नतमस्तक झाला.माझ्या आईवडील,शिक्षकांची,
गावक-यांची,इंडियन आर्मीची मेहनत आहे.आईवडील विटभट्टी काम करायचे सर्वांचे
आभार.मायभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत अविनाश साबळे याने
व्यक्त केले.चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३ हजार मिटर स्टीपलचेस
स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि ५ हजार मीटर स्पर्धेमध्ये रौप्यपदक अविनाश साबळे याने
जिंकले.यामुळे भारत देशाचे नाव उंचावले. शनिवारी दि. ७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी
अविनाश आष्टी तालुक्यातील मांडवा येथे आपल्या जन्मगावी आला.यावेळी ग्रामस्थांनी
त्याची वाजत गाजत, फुलांची उधळण करत गावभर मिरवणूक काढली. अनेकांनी त्याला डोक्यावर
घेत घोषणाबाजी केली.यावेळी अविनाश म्हणाला,ऑलिम्पिकचे एक काय अनेक पदके आपल्या
देशाला मिळू शकतात.माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही.२०२३ मध्ये मी गोल्ड
मेडल आणि सिल्व्हर मेडल चीनमध्ये आॕलिंपिक स्पर्धेत जिंकलो.मी रात्रंदिवस सराव करत
आहे.माझ्या गावच्या ग्रामस्थांनी जो सन्मान करून सत्कार केला त्यांचा मी मनापासून
आभारी आहे.यावेळी सरपंच सुभाष माळी, उपसरपंच संतोष मुटकुळे,माजी सरपंच अशोक
मुटकुळे,माजी सरपंच देवा धुमाळ, योगेश मुटकुळे,प्रा.सुनिल मुटकुळे,विठ्ठल
मुटकुळे,तलाठी बाळासाहेब बनगे, प्रा.डॉ.बाबासाहेब मुटकुळे,विजय मुटकुळे,युवराज
मुटकुळे,रावसाहेब मुटकुळे,अनिल मुटकुळे,भगवान श्रीखंडे,योगेश कदम, ,ज्ञानदेव
मुटकुळे,शरद पवार,योगेश मुटकुळे,सचिन मुटकुळे,सुनील तरटे सर,धुमाळ सर, बाबासाहेब
तावरे,पत्रकार अविनाश कदम,जावेद पठाण, सचिन रानडे,अक्षय विधाते,अशोक मुटकुळे,
श्रीपाद मुटकुळे,लक्ष्मण वीर,चेअरमन पोपटराव मुटकुळे,अमृत मुटकुळे,




आप्पा शिंदे आदी
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या