





उत्तम बोडखे,आष्टी.
---------------
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य रणसंग्रामाचा धगधगता इतिहास सांगणारे गाथा मुक्ती संग्रामाची हे दोन अंकी नाटक बीड येथील परिवर्तन प्रतिष्ठानचे डॉ. सतीश साळुंखे यांच्या दिग्दर्शनातून आणि शैलेश गोजम मुंडे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाच्या सादरी करणाने आष्टी येथील शालेय विद्यार्थी,विद्यार्थीनी मंत्रमुग्ध झाले.
या विद्यार्थ्यांच्या रेकॉर्ड ब्रेक उपस्थितीमुळे या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा मिळाला.दोन तास चाललेल्या या नाटका मध्ये मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या मराठवाड्यातील बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जुलमी रझाकारांशी लढा देऊन..मराठवाड्यातील शूरवीर युवकांनी धगधगता इतिहास घडवला..या नाटकातील कलावंतांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने साक्षात मराठवाडा मुक्ती संग्राम मधील अनेक प्रसंगांना साक्षात उभे केले आणि अत्यंत उत्कृष्ट सादरीकरणामुळे आष्टीकर प्रेक्षक आणि विशेषतः आष्टी तालुक्यातील अनेक शाळांमधील उपस्थित असलेल्या विद्यार्थी,विद्यार्थीनी यांना प्रेरणादायी ठरेल असे उत्कृष्ट सादरीकरण या कलावंतांनी केले.त्यामध्ये निजाम आणि रझाकाराच्या विरोधात आपल्या वर्तमानपत्रातून अन्यायाला वाचा फोडणारा आणि मराठवाड्याच्या बाजूने लिहिणारा पत्रकार शोएब उल्लाह याचा रझाकारांनी केलेला खून.. मराठवाड्याची झाशीची राणी म्हणून ओळखली जाणारी दगडाबाई शेळके किंवा सामान्य कुटुंबात ज्याने आपले देशासाठी बलिदान दिलं तो सांडू न्हावी यांच्या तसेच अन्य हुतात्म्यांच्या जीवनावरील अत्यंत वेधक आणि हृदय स्पर्शी प्रसंग या नाटकांमध्ये उभे केले गेले होते या नाटकातील पोवाडे आणि गोंधळ यासारख्या लोकगीतांनी हे नाटक विलक्षण प्रभावी झाले.या सादरीकरणाला विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन भारत मातेच्या घोषणा देऊन प्रतिसाद दिला.
सुरुवातीला आ.बाळासाहेब आजबे यांनी थोर स्वातंत्र्यसैनिक मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि माजी आ.भीमराव धोंडे यांनी श्रीफळ अर्पण केले.तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी या गाथा मुक्ती संग्रामाच्या या नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रा.डॉ.सतीश साळुंखे यांचे स्वागत केले.या कार्यक्रमास बलभीमराव सुंबरे,बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डाॕ.शिवाजी राऊत,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे ,विजय आमटे सर,हरिभाऊ दाहातोंडे,सरपंच बबन डोके,ताराचंद कानडे,संदीप नागरगोजे,नायब तहसीलदार बाळदत्त मोरे,नायब तहसीलदार धावणे,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,पत्रकार उत्तम बोडखे,प्रवीण पोकळे,शरद तळेकर,गणेश दळवी,अविनाश कदम हे उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सतीश दळवी यांनी केले.
0 टिप्पण्या