आष्टी
गेली ३० वर्षाची परंपरा असलेल्या पत्रकार उत्तम बोडखे संपादित आष्टी वार्ताहर दीपोत्सव अंकाचे प्रसिद्ध गायिका,अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते मुंबई येथे शनिवार दि.२९ आक्टोबर २०२३ रोजी प्रकाशन होणार आहे.
या अंकाचे मार्गदर्शक कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन तर कार्यकारी संपादक दत्ताभाऊ बोडखे यांनी भूमिका बजावली आहे.ज्येष्ठ पत्रकारांचे सहकार्य लाभलेल्या या दिवाळी अंकात आकाश डोंगरे यांची कव्हर स्टोरी.उज्वला शिंदे,
ज्योती सोनवणे,समीर गायकवाड,वसंत बिवरे यांच्या कथा तर प्राचार्य दत्तात्रय वाघ,डॉ.कैलास दौंड,प्रफुल्ल सहस्रबुद्धे, बबीता उत्तम बोडखे,प्रा.
बिभीषण चाटे,ऋषिकेश राऊत,भगवान राऊत, सिद्धनाथ मेटे महाराज,
भीमराव गुरव,प्रताप नलावडे,डॉ.सय्यद हुमायुद्दीन,प्रा.डॉ.
जी.पी.बोडखे,
ह.भ.प.दिनकर महाराज तांदळे,प्रा.दिपाली सातव (विधाते) यांचे लेख.तर ज्येष्ठकवी खलील मोमीन,प्रभाकर साळेगावकर,डी.के.
शेख,शिवाजी सातपुते,
विठ्ठल जाधव,हरीश हातवटे,सौ.अर्चना स्वामी,शिवराम हाके,सौ.संगीता होळकर (औटे) यांच्या कविता आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार भरत घाटे यांच्या व्यंगचित्रासह कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या उपहासिका असा भरगच्च लेखन प्रपंच यंदाच्या आष्टी वार्ताहर दिवाळी अंकात आहे.

0 टिप्पण्या