Ticker

6/recent/ticker-posts

मुलाचे कर्तृत्व बहरले; मायमाऊलीचा मंचावर सन्मान! बोडखे कुटुंबीय गहिवरले............. खा.डाॕ.सुजयदादांनीसुध्दा मायमाऊलीचे घेतले दर्शन ... ---------------------------- 'शब्दगंध' च्यावतीने मान्यवरांच्या हस्ते उत्तम बोडखे यांचा गौरव

बीड. गेल्या तीन दशकावरूनही अधिक काळ सातत्याने लेखणीची सुसंगत सकारात्मक दिशेने वाटचाल करून गुणवंतांना न्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा इतिहास निर्माण करणाऱ्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांच्या अमोघ कार्यकर्तृत्वाची दखल घेत शब्दगंध साहित्य संमेलनात खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला.यावेळी उत्तमरावांना घडवणाऱ्या माता माय माऊलीचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रचंड टाळ्यांचा गजर पाहून संपूर्ण बोडखे परिवार अक्षरशः गहिवरून गेला. निमित्त होते १५ व्या.शब्दगंध साहित्य संमेलनाचे.संमेलनाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर,स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप,आमदार अरुणकाका जगताप,माजी आमदार भीमराव धोंडे,माजी कुलगुरु डाॕ.सर्जेराव निमसे, संमेलनाध्यक्ष आ.लहू कानडे,इंद्रजीत भालेराव रोहिणीताई शेंडगे,गणेश भोसले,अरविंद पारगावकर आदि शब्दगंधाचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सचिव सुनील गोसावी,भगवान राऊत,अशोक कानडे, ज्ञानदेव पांडुळे आदिसह साहित्यिक आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. राज्यभरातील अत्यंत मोजक्या आणि गुणवत्ता संपन्न साहित्यिकांच्या साहित्याची दखल घेत या मंचावर खासदार,आमदारासह वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या शुभहस्ते गौरव करण्याचा हा योग होता.याच मंचावर सोमवारी आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांना शब्दगंधाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी कर्तृत्ववान मुलगा उत्तमराव बोडखे यांनी आपल्या मातेचे दर्शन घेतले.हे पाहुन संस्कारात वाढलेले खासदार डाॕ.सुजयदादा विखे पटील यांनी बोडखे यांंच्या मातेचे दर्शन घेत आपला विनम्रपणा ,लिनता याचे दर्शन घडविले.पुरस्कार स्वीकारण्यासाठी उत्तमराव बोडखे यांच्या मातोश्री श्रीमती रंगुबाई लक्ष्मणराव बोडखे तसेच सौभाग्यवती बबीताताई बोडखे आवर्जून उपस्थित होत्या.आपल्या लेकाचे कर्तुत्व आणि बड्या साहित्यिक आणि लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते होणारा सत्कार अनुभवताना वृद्ध मातोश्रींचे डोळे अक्षरशः पानावले होते! अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात राहून शेतीमध्ये काबाडकष्ट करून इयत्ता पहिलीपासून जिल्हा परिषदेच्या शाळेत घालून लेकराला अ ब क ड चे धडे देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या माय माऊलींचे यावेळी खऱ्या अर्थाने पांग फिटले! पत्रकार उत्तमराव बोडखे यांची लेखणी शेतकरी,कामगार,ऊसतोड मजूर,गुणवंत आणि अन्यायाला वाचा फोडणारी ठरली आहे. याची दखल घेत आजपर्यंत राज्य,विभाग,
जिल्हा असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. आजच्या या शब्दगंधाच्या पुरस्काराने त्यांच्या कार्यकर्तृत्ववाची रेषा आणखीनच व्याप्त झाली असून जिल्ह्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक,धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक क्षेत्रातील गुनी जणांनी उत्तमराव यांचे अभिनंदन केले आहे.या कौतुकाने आपण अक्षरशः भारावलो असून समाजाच्या भल्यासाठी आपली लेखणी यापुढे ही सदैव चालत राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. *********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या