Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव ग्रा.पं.रेकॉर्डला पीटीआर उताऱ्यावरील खोट्या नोंदणी रद्द करून कायदेशीर कार्यवाही करावी ............ भारत पोपट गोंडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

आष्टी. आष्टी तालुक्यातील जळगाव ग्रा.पं.मधील तात्कालीन ग्रामसेवक हनुमंत गायकवाड यांनी गावातील माजी सरपंच रामहरी धुमाळ यांच्या राजकीय दबावाखाली १९ लोकांच्या नावाची नोंद जळगाव ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीमध्ये बेकायदेशीरपणे केली असल्यामुळे या नोंदी तात्काळ रद्द करून संबंधितांवर कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी भारत पोपट गोंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दि.११ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की,हनुमंत गायकवाड तात्कालीन ग्रामसेवक (रा.लोणी ता.आष्टी)रामहरी धुमाळ, स्वप्निल शिंदे,प्रशांत धुमाळ,तुषार फुंदे,गणेश पोकळे,बाळासाहेब देसाई, विकास गायक,बलभीम धुमाळ,यशवंत खवले,स्वप्निल कलवडे,नितेश गुंदेचा,नवनाथ जाधव,अमोल सानप, मच्छिंद्र शेंडे,राहुल ढोबळे,राजेंद्र शिंदे,संतोष राऊत,कांताबाई जाधव या लोकांच्या नावाची नोंद जळगाव ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीमध्ये बेकायदेशीररित्या नोंद घेतलेली आहे.या नोंदींना कुठलाही कायदेशीर आधार नाही.तात्कालीन ग्रामसेवक हनुमंत गायकवाड यांनी या लोकांच्या नावांची खोटी नोंद मालमत्ता नोंदवहीला घेतली आणि तसेच पीटीआर उतारे देखील त्या लोकांना दिलेले आहेत.याबाबत आम्ही सध्याचे ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती आष्टी यांना माहिती दिली असता त्यांनी राजकीय दबावाखाली आमची तक्रार घेतली नाही. त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत गायकवाड यांची चौकशी करून पीटीआरला नोंद घेतलेल्या १९ लोकांना देऊन त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर पुरावे तपासावेत.या बेकायदेशीर नोंदी तात्काळ रद्द कराव्यात कराव्यात आणि संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी.या निवेदनात म्हटले आहे की,माजी सरपंचाने आपल्या पदावर नसतांना काळुबाई मारोती भिसे आणि बायशी उत्तरेश्वर भिसे अ.क्रं.७८३ सर्व्हे नं.२९ मालमत्ता क्रं.५८१ स्वतः सामाईक म्हणुन ३५०० चौ.फुट जागा शपथपत्राआधारे आपल्या नांवे नोंदवुन घेतली. त्यावर आष्टी नागरी सहकारी पतसंस्था यांचा रक्कम १०,००,००० रुपयेचा बोजा दाखवला.अशा तऱ्हेने गैरअर्जदार क्रं.१ ते १९ यांनी आपसात संगनमत करुन बेकायदेशीर कृत्य केलेले आहे. त्याची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. गैरअर्जदार क्रं.२ स्वप्नील शिंदे यांची मालमत्ता क्रं.२०३ ला बेकायदेशीरपणे नोंद घेतली आहे.तो स्वप्नील शिंदे माजी सरपंच रामहरी धुमाळ यांचा भाचा आहे शिवाय ते घर क्रं.२०३ पुर्वी मयत भिमाबाई एकनाथ गायकवाड यांचे नावे होती.भिमाबाई गायकवाड ही दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी कोव्हीडमुळे मयत झाली आहे.तिला कोणीही वारस नव्हते.ही बाब माजी सरपंच रामहरी धुमाळ यास माहिती होती.त्याचा गैरफायदा घेऊन माजी सरपंच धुमाळ यांनी आपल्या नावाची नोंद (स्वप्नील शिंदे)चे नाव गैरअर्जदार क्रं.१ ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करुन मालमत्ता नोंद वहीला खोटी नोंद घेतली आहे. याचीही चौकशी करण्यात यावी असेही निवेदनात भारत गोंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या