




प्रा.महेश चवरे,आष्टी.
---------------
पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ
दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा,
प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर कथाकथन, काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य
लेखन वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर आदी उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर
विविध स्पर्धा घेत वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी
राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी ७ व ८ आक्टोबर २०२३ रोजी
“ १५ वे.राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन शनिवार व रविवारी आयोजित करण्यात आले
आहे.या कार्यक्रमामध्ये साहित्य लोकजागर यात्रा,उद्घाटन, काव्यसंमेलन,
कथाकथन,परिसंवाद,चर्चासत्र,पुस्तक प्रकाशन,सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक वितरण
आणि समारोप समारंभ होत आहे.ख्यातनाम साहित्यिकांसह नवोदित साहित्यिक मोठ्या
संख्येने सहभागी होत आहेत. आज रविवार दि.८ आक्टोबर २०२३ रोजी दु.३.३० वा. सन २०२१ व
२०२२ चा " वाड्मय पुरस्कार वितरण सोहळा" होत आहे.सन्मान साहित्य आणि पत्रकारितेचा
हा शब्दगंध साहित्य चळवळीचा सन्मान आपणांस मिळाल्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करत
आहोत.एका संपन्न परंपरेचे आपण सार्थ वारस आहात.आपण आपल्या कर्तृत्व आणि
कार्यक्षमतेने स्वतःला सिध्द केले आहे.पत्रपंडीत स्व. मोतीरामजी वरपे दादांचे लाडके
शिष्य आणि गेली ३५ वर्षे झुंजारनेता परिवारात सदस्य राहुन कार्यरत आहात.उपसंपादक
म्हणुन आपण खूप पुढे गेला आहात.ज्या झुंजारनेताने अनेक नेते,साहित्यिक,कलावंत,
उद्योजक,स्वयंसेवक आणि जागरूक नागरिक,वाचक घडवले त्या दैनिकाचे आमच्या जीवनातील
अढळस्थान आपण अधिक ठळक केले आहे.दैनिक झुंजारनेता हा बीडच्या इतिहासाचा सर्वाधिक
सजग,डोळस आणि अभ्यासू भाष्यकार आहे आणि हे स्थान दैनिकाने व आपण अथक परिश्रमातून
आणि विधायक भावनेतून प्राप्त केले आहे. आधी केले मग सांगितले.या भावनेतून आपण
कार्यरत आहात.पत्रकाराच्या लेखणीतून चांगला भाव प्रकट होऊन त्यातून चांगले कार्य
उभे राहावे या हेतूने आपण ३५ वर्षे लिहिते राहिलात. दैनिकाच्या माध्यमातून प्रश्न
मांडताना ते सोडवले सुद्धा,आपले पत्रकारितेतील योगदान हे अतुलनीय आहे.आपल्या या
निरलस कार्याला तोड नाही.पत्रकारितेचे अजोड कार्य आपणामध्ये पाहायला मिळते म्हणूनच
आज आपला सन्मान करत आहोत.आम्ही आपल्या कार्याबद्दल शब्दगंध साहित्य चळवळीच्यावतीने
आपले अभिनंदन करत आहोत.
-----------------
प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष
आहे.प्रत्येकाची जीवन जगत असताना वेगळी अशी खासियत असते जीच्यामुळेच आपण
इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो की, आपण कोण आहोत,कसे आहोत किंवा
एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो किंबहुना त्याप्रसंगी कसे काम करतोत यावरूनच आपले
वेगळेपण सिद्ध होत असते.भारतीय लोकशाहीचे संसद,प्रशासन, न्यायपालिका आणि वृत्तपत्र
हे मुख्य चार आधारस्तंभ आहेत.मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांनी पत्रकार म्हणून वृत्तपत्राचा महाराष्ट्रात पाया घातला.पत्रकार हा एक असा
व्यक्ती असतो जो समाजात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटना,प्रसंगाविषयी,
भ्रष्टाचारविषयी वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेऊन माहिती गोळा करत असतो आणि
वृत्तपत्र माध्यमातून समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतो.
त्याच्या याच व्यवसायाला पत्रकारिता असे म्हटले जाते.मराठवाड्यात अग्रगण्य असलेले व
बीड जिल्ह्यात नंबर एकचे वृत्तपत्र म्हणून दैनिक झुंजारनेताचा लौकिक आहे.या
वृत्तपत्रात आष्टी तालुका प्रतिनिधी म्हणून उत्तम बोडखे गेली ३५ वर्षे सातत्याने
काम करत आहेत.एकाच वृत्तपत्रात सलग ३५ वर्षे पत्रकार म्हणून काम करणे हे कदाचित
महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे दैनिक झुंजारनेताचे मुख्यसंपादक असलेल्या वरपे
कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीबरोबर उत्तमराव बोडखे आज काम करत आहेत.त्यांच्या याच काम
रुपी कर्तृत्वाची दखल घेऊन तीन वर्षापुर्वी दैनिक झुंजारनेताच्या उपसंपादकपदी
त्यांची निवड झाली आहे.उत्तमराव बोडखे यांचा सर्वच ठिकाणी जेष्ठ पत्रकार म्हणून
उल्लेख केला जातो पण माझ्या मते ते जेष्ठ नाही तर श्रेष्ठ पत्रकार आहेत कारण
जेष्ठत्व माणसाच्या वयानुसार ठरले जाते पण श्रेष्ठत्व त्याच्या कार्यानुसार ठरवले
जाते.पत्रकारीता क्षेत्रातील त्यांच्या ज्ञान,अनुभव व योगदानामुळे त्यांना श्रेष्ठ
पत्रकार म्हणणे योग्य ठरेल.पत्रकार रोज नवीन प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या
घटना,घडामोडी वा माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचविणारा व्यक्ती असतो.चांगला
पत्रकार होण्यासाठी त्याच्याकडे बातम्याचे चांगले स्रोत उपलब्ध असायला
हवेत.त्यासाठी प्रभावी जनसंपर्क त्याचा असायला हवा.पत्रकार उत्तमराव बोडखे यांचा
समाजातील सर्व घटकांतील लोकांशी चांगला संपर्क आहे. बीड जिल्ह्यात वृत्तपत्र व
पत्रकारिता क्षेत्रात उत्तमराव बोडखे हे नाव प्रसिद्ध तर आहेच पण आष्टी तालुक्यातील
प्रत्येक गावात त्यांना ओळखणारा मोठा वर्ग आहे.त्यांचा लोकांशी वैयक्तिक चांगला
संबंध आहे.आष्टी तालुक्यातील कुठल्याही सामाजिक,वैयक्तीक सुख दुःखाच्या कार्यक्रमात
उत्तमराव बोडखे यांची उपस्थिती कायम दिसते.धार्मिक वृत्तीचे त्यांचे कुटुंब
असल्यामुळे सप्ताह,कीर्तन,भजन कार्यक्रमात ते नेहमी हजेरी लावतात.अनेक नामांकित
कीर्तनकारांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत.आष्टी किंवा परिसरात कुठल्याही राजकीय
पक्षाची सभा असली तरी त्या सभेतील प्रमुख नेत्यांकडून उत्तमराव बोडखे यांचे नाव
घेतल्याशिवाय ती सभा पूर्ण होत नाही.आष्टीचे आ.बाळासाहेब आजबे यांच्याशी ते दाजी
मेव्हुण्याचे नाते सांगतात तर आ.सुरेश धस यांच्याबरोबरचे कॉलेजच्या मैत्रीचे किस्से
ते एकवतात.दररोज सकाळी सुप्रभात ग्रुपमध्ये दरेकरनाना यांच्याबरोबर ते गप्पांचे फड
रंगवतात तर माजी आ.भीमराव धोंडे यांचे ते विश्वासु आणि स्नेही आहेत.त्यामुळे धोंडे
साहेबांच्या राजकीय,कौटुंबिक अनेक प्रसंगाचे ते साक्षीदार राहिलेले आहेत.उत्तमराव
बोलायला परखड व स्पष्ट आहेत पण मनाने तितकेच निर्मळ असलेले त्यांचे व्यक्तिमत्व
आहे.घडणारी कुठलीही अनुकूल, प्रतिकूल घटना ते तिथेच सोडून देतात आणि पुढे आपल्या
कामाला लागतात ते फारसे कधी नाराज असलेले दिसत नाहीत.प्रत्येक काम उत्साहांने करणे
हा त्यांचा स्वभाव आहे.आष्टी तालुक्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे.आपले वृत्तपत्र
आष्टी तालुक्यात नेहमी नंबर एक वरच राहिले पाहिजे.यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न
असतो.समाजकारण,राजकारण, शिक्षण,शेती,विज्ञान,तंत्रज्ञान,कला,क्रीडा,
साहित्य या
विविध क्षेत्रातील रोज किमान आठ ते दहा बातम्या त्यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध
होतात.बातम्या बरोबरच वृत्तपत्राचे व्यवसायिक हीत ही ते जोपासतात.प्रत्येक वर्षी
विविध क्षेत्रातील मान्यवरांचे दर्जेदार लेख असलेला दिवाळी अंक त्यांचा प्रसिद्ध
होतो.पत्रकारिता करत असताना आपली बांधीलकी नागरिकांशी व समाजाशी आहे याचा त्यांनी
कधीही विसर पडू दिला नाही.आपल्या लेखणीतून राजकीय व सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा
त्यांनी कायम प्रयत्न केला.आष्टी तालुक्यातील माझ्यासहीत अनेक लेखकांना ते
लिखाणासाठी नेहमी प्रोत्साहन देतात.स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी रोज व्यायाम
करणे,मित्र व कुटुंबाबरोबर धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळ पाहणे हा त्यांचा आवडता छंद
आहे.कुठेही शेती व व्यवसाय क्षेत्रात नवीन झालेले प्रयोग पाहायला जाणे व त्याची
माहिती घेऊन नवीन शेतकरी व उद्योजक यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्याची माहिती
वर्तमानपत्रात प्रसिद्ध करतात.पत्रकारांना समाज जीवनात नेहमीच मोठे स्थान मिळालेले
आहे.बोडखे साहेबांना तर पत्रकारीता आनंदी व उत्साही मनाने करण्याची उत्तम रीत गवसली
आहे.दैनिक झुंजारनेताचे सर्वोत्तम पत्रकार असलेल्या उत्तमराव बोडखे साहेबांचा आज
राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तथा अ.भा.समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगन
भुजबळ यांंच्या हस्ते अहमदनगर या ऐतिहासिक नगरीत गौरव केला जात आहे.त्यांना आज
मिळणाऱ्या पुरस्काराबद्दल मनपुर्वक अभिनंदन ...!!
लेखक
प्रा.महेश चौरे,(आष्टी)
*******************
0 टिप्पण्या