Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत सोमवारी " हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्रामाचे रणसंग्राम " ऐतिहासिक नाटक ----- प्रा.डाॕ.सतीश सांळुके

आष्टी. हैदराबाद संस्थानाचा जाज्वल्य लढा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनाच्यावतीने "हैदराबाद स्वातंत्र्याचा रणसंग्राम "या भव्य ऐतिहासिक नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.या नाटकाचा मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आष्टी येथे उद्या सोमवार दि.९ आक्टोबर रोजी दुपारी २ वाजता आष्टी येथील लक्ष्मी लॉन्स येथे प्रयोग आयोजित करण्यात आल्याची माहिती आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी दिली.या नाटकाचे जिल्हाभर प्रयोग होणार असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.या नाटकाचे लेखन प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक डॉ.सतीश साळुंके यांनी केले आहे. मराठवाड्याच्या ७६ तालुक्यामध्ये हे नाटक होणार असल्याची माहिती डाॅ.सतीष साळुंके यांनी आष्टीत पत्रकारांना दिली.आष्टी येथे तहसीलदार श्री गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये डॉ.सतीश साळुंके यांच्यासह नाटकातील प्रमुख कलावंत उपस्थित होते.यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, हे या नाटकात मराठवाड्याच्या रणसंग्रामाचा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास इतिहास मांडण्यात आला आहे.नवीन पिढीसमोर हा इतिहास जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.यामुळे आष्टी शहरातील आणि परिसरातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराने तसेच शासकीय कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. हे नाटक प्रेक्षकांसाठी मोफत दाखवले जाणार आहे.या नाटकात २५ ते ३० कलावंत भाग घेणार आहेत. या नाटकात गोंधळ,पोवाडा,भारुड यासारख्या लोकगीतांच्या माध्यमातून आणि शाहिरीच्या माध्यमातून हा इतिहास सांगितला जाणार असल्याचे पत्रकारांना सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या