आष्टी .
शनिवार दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी,आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोग निदान शिबिर संपन्न झाले.यात अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल टेकाडे,बालरोग,नितीन घोडके,कान,नाक,घसा तज्ञ डॉ.बालाजी गुट्टे,जनरल सर्जन डॉ.सुजित लहाने,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख इमराना,स्त्रिरोग तज्ञ डॉ.शोभा टकले,वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती मोरे,डॉ.सुषमा सुंबे,डॉ.मयुरी नवले यांनी उपचार केले.प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियान,आरोग्य मेळा,सर्व रोग निदान शिबिर या अंतर्गत भव्य रोग निदान शिबिरात ३०७ रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी उपचारासाठी संबंधित सर्व तज्ञ डॉक्टर, ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटरच्या सर्व अधिपरिचारिका,कर्मचारी,आष्टी येथील यशवंत नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी,विद्यार्थी परिचारिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आष्टी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या