Ticker

6/recent/ticker-posts

अभिनय आणि गायन क्षेत्रातील अस्सल सोने- केतकी माटेगावकर!

उत्तम बोडखे,आष्टी. ---------------- '...अगदी बालपणापासून आपल्या आई-वडिलांच्या सावलीत लहानाचे मोठे होत असताना गायन आणि अभिनयाचे संस्कार होऊन दर्जेदार गुणवत्तेच्या बळावर महाराष्ट्राच्या अभिनय आणि गायन क्षेत्रावर स्वतःची वेगळी छाप पाडून क्षितिज निर्माण करणारी अत्यंत गुणवान देखणी आणि तितकीच गुणसंपन्न अभिनेत्री म्हणून केतकी माटेगावकर हिचे स्थान आता वरच्या पातळीवर आले आहे.गायिका सुवर्णा माटेगावकरची लेक आणि उत्तम हार्मोनिययम वदक,प्रसिध्द किबोर्ड वादक पराग माटेगावकर यांची कन्याअ भिनेत्री केतकी माटेगावकरआहे.बालगायिका म्हणून अनेक कार्यक्रमातून बालगीते सादर करणारी अशी केतकीची ओळख.ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री,गायिका अशी स्वतंत्र ओळख केतकी माटेगावकरने निर्माण केली.लहानपणापासून गायनाची साधना करत आई बाबांचे बोट धरून कलाक्षेत्रामध्ये केतकीने पाऊल ठेवले.लहानपणी नक्षत्रांचे देणे,सूरताल या कार्यक्रमांमधून दिसणारी गोंडस चेहर्‍याची केतकी पुढे गाण्यातच करिअर करेल हे तर ठरले होतेच पण सर्वांगसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकेल असा अंदाजही कोणी लावला नव्हता.केतकीने आजपर्यंत अनेक अल्बम्समध्ये गाणी गायले आहेत,तिच्या गाण्याचे स्वतंत्र अल्बम प्रसिद्ध झाले आहेत.अनेक मराठी चित्रपटांसाठी सॉफ्ट रोमँटीक अंदाजामध्ये तिने गाणी गायली आहेत.केतकीच्या अभिनयामुळे आणि तिच्या गाण्यामुळे तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. केतकीचा जन्म २२ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये झाला.तिचे बालपणही नागपूरातच गेले.केतकी ही सुप्रसिद्ध हार्मोनियमवादाक आणि कि बोर्ड वादक पराग माटेगावकर आणि गायिका सुवर्णा माटेगावकर या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे.या दोघांमुळेच तिच्यावर गाण्याचे संस्कार झाले.हळू हळू आईबाबांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ती दिसू लागली. २०१० मध्ये केतकी " सारेगमप लिटील चॅम्प्समध्ये " स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.यामध्ये तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सला परिक्षकांची दाद मिळाली.यातूनच पुढे तिला गायनाच्या अनेक संधी मिळाल्या.तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. केतकीचे अनेक अभंग अजोड आहे.आवाजाची दैवी शक्ती तिला मिळाली आहे.मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीतील कथेवर आधारीत हा सिनेमा.तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.या चित्रपटामध्ये अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.केतकीचा हा पहिलाच चित्रपट आहे.१९७० च्या दशकात घडणारी ही गोष्ट आहे. एकाच शाळेमध्ये शिकणारे जोशी आणि शिरोडकर यांच्यात हळूवारपणे फुलणा्रे एकतर्फी प्रेम तसेच शिरोडकरच्या मनातील त्याच्याविषयी असलेल्या भावना समजून घेण्यासाठी केलेला आटापिटा या सगळ्याचे चित्रण चित्रपटामध्ये आहे.ह्या चित्रपटाला इतक्या सहज सोप्या पद्धतीने सादर केले की प्रेक्षकांना तर भावलेच, तसेच समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळाली.या सगळ्यासोबतच बेस्ट स्क्रीनप्ले विभागासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये केतकी माटेगावकर सोबतच सचिन खेडेकर,मेधा मांजरेकर,अभिजित केळकर,प्रिया बापट या कलाकारांच्याही मुख्य भूमिका होत्या.उषा दातार यांनी लिहिलेल्या लघुकथेवर आधारीत ’जन्मगाठ’ या मराठी नाटकाचे दिग्दर्शन व मुख्य भूमिका विनय आपटे यांनी केली होती.याचाच पुढे काकस्पर्श हा चित्रपट तयार करण्यात आला.साधारणपणे १९३०- १९५० च्या काळात कोकणामध्ये घडलेली ही गोष्ट अहे.बालवयातच लग्न झालेल्या मुलीला अकाली वैधव्य येते आणि तिच्या नवर्‍याच्या पिंडाला कावळा शिवण्यापासून ही कथा सुरु होते.तिच्यापेक्षा वयाने बर्‍यापैकी मोठा असलेला तिचा दीर गावातल्या अनेक रुढी झुगारून देत तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो.या सगळ्यात नकळतपणे त्यांच्यात फुललेले नाते अशा विलक्षण प्रेमाची ही गोष्ट आहे.ह्या चित्रपटाचे पुढे अनेक भाषांमध्ये रिमेक झाले.ज्यांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनीच केले. " तानी " हा केतकी माटेगावकरचा तिसरा चित्रपट.या चित्रपटामध्ये अरुण नलावडे, गिरीश ओक,इला भाटे यांच्या भूमिका आहेत.एका गरीब कुटूंबातल्या मुलीची शिक्षणाकडे असलेली ओढ आणि तिला शिकवण्यासाठी जीवाचे रान करणार्‍या वडलांची ही गोष्ट आहे. या चित्रपटाला व्यावसायिक पातळीवर फारसे यश मिळवता आले नसले तरी केतकीची मध्यवर्ती भूमिका भाव खाऊन गेली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये नव्वदीच्या दशकात घडलेली दगडू आणि प्राजक्ता यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आले.यामध्ये केतकीसोबत प्रथमेश परब,भाऊ कदम, वैभव मांगले,उर्मिला कोठारे हेसुद्धा होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. ह्या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय यासोबतच या चित्रपटातली गाणी ही या जमेची बाजू. या चित्रपटाने मराठी चित्रपटाच्या इतिहासातील बरेच रेकॉर्ड्स मोडले होते.या चित्रपटाचा तेलुगू रिमेकही आला. तसेच काहीच वर्षात या चित्रपटाचा सिक्वेलही आला आणि दुसर्‍या भागातही केतकीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.जरा वेगळं नाव, वेगळी कथा,कथेचे वेगळे सादरीकरण असा हा चित्रपट. या चित्रपटाचा दिग्दर्शकही सुजय डहाके आहे ज्याने शाळा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.केतकी माटेगावकर आणि मदन देवधर यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. तसेच शिवानी रांगोळे, शिवराज वायचळ यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.सा यन्सवर आधारीत ह्या चित्रपटामध्ये बर्‍याचशा फॅन्टसी क्रिएट केल्या आहेत. ज्या आजच्या तरुणाईला आकर्षित करणार्‍या आहेत. टाईमपास या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्याचा सिक्वेल आला.अर्थातच सिक्वेल म्हणल्यावर आधीच्या चित्रपटाची पुढची कथा दाखवण्यात आली.मोठे झालेले दगडू म्हणजे प्रियदर्शन जाधव आणि प्राजू म्हणजेच प्रिया बापट यांनी ह्या भूमिका केल्या आहेत. आधीच्या भागात अर्धवट दाखवलेली प्रेमकथा या भागात पूर्ण झालेली दाखवली आहे.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे केतकी अभिनेत्री म्हणून तर दिसलीच पण त्यासोबतच तिने चित्रपटातील ’सुन्या सुन्या’ हे गाणे गायले आहे. केतकी माटेगावकरने अभिनय आणि गायन अशा दोन्हीही क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे.सध्या अंकुश हा चित्रपट गाजत आहे.मराठीतील लव्हस्टोरी आहे.तिला मिळालेल्या पारितोषिकांची यादी मोठी आहे. गायनासाठी शाहू मोडक पुरस्कार,मराठी फिल्मफेअर अवॉर्ड,गदिमा प्रज्ञा पुरस्कार,मिर्ची म्युझिक अवॉर्डने सन्मानित केले आहे. अभिनयासाठी ४९ वा.राज्य पुरस्कार (शाळा चित्रपटातील भूमिकेसाठी), नर्गिस दत्त पुरस्कार,दुरदर्शन गोदरेज अवॉर्ड अशा नामांकित पुरस्कारांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली आहे.केतकीच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा!
आणि दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने सदिच्छा.... -----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या