आष्टी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सलग १७ दिवस उपोषण केले होते.त्यावेळी राज्य सरकारने ३० दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाले काढू असे सांगितल्यामुळे आंदोलन थांबले होते.दरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी १० दिवसाची मुदत वाढून दिली होती.त्यानंतरही राज्य सरकारने आरक्षण न दिल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.त्या उपोषणास पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील कडा व आष्टी येथे बेमुदत आमरण साखळी उपोषण आजपासून सुरू करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील आष्टी आणि कडा या महत्त्वाच्या दोन शहरांमध्ये हे उपोषण सुरू झाले आहे. त्या ठिकाणी तालुक्यातील गावांनी सोयीनुसार यायचे आहे.आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावात मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत आमदार खासदार व पुढार्यांना तसेच सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात येणार असल्याचे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी घेतलेले आहेत.आष्टी व कडा या ठिकाणी अमरण उपोषणास मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आष्टी शहरातुन शांततेत
कॕन्टल मार्च संपन्न
----------------------
आष्टी शहरात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी
आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या समर्थनार्थ सायं.७ छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन कॅन्डल मार्च काढत जनजागृती सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी तरुण व नागरिक
मोठया संख्येने उपस्थित होते.आष्टी शहरात सकल मराठा समाज आष्टी तालुक्याच्यावतीने मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण गुरुवार दि.२६ ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवसापासून सुरुवात झाली आहे.यानिमित्ताने आष्टी शहरातुन भव्य कॅन्डल मार्च काढत
मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाज बांधवांनी पाठींबा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या समाज बांधवांना श्रद्धांजली व गुरुवारी आष्टी तालुक्यात दोन भीषण अपघातात मयत झालेल्या निष्पाप नागरिक व ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संपुर्ण आचारसंहितेचे पालन करत कसलीही घोषणाबाजी आणि संवाद न करता छत्रपती शिवाजी महाराज चौक- शनिचौक- भाजीमंडई-मारवाडीगल्ली-कमानवेश-शनिमंदिर या मार्गे अतिशय शांततेत मेणबत्ती जनजागृती
पायी रॅली काढण्यात आली होती.शांततापूर्ण कॅन्डल मार्चनंतर उपस्थिती समाज बांधवांनी ह.भ.प. नानासाहेब भोगाडे महाराज पांढरीकर यांचे हरि कीर्तन झाले. या कार्यक्रमाचे अतिशय शांततापूर्ण सुंदर नियोजन साखळी उपोषणाचे संयोजक व सकल मराठा समाज बांधवांनी केले होते.यावेळी आष्टी तालुक्यातील मराठा समाज
0 टिप्पण्या