Ticker

6/recent/ticker-posts

वाळुंज येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्यामधील चित्रफितींचा वेळ आणि घटनाक्रम यांचा सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबद्वारा तपास करावा ------आ.सुरेश धस यांची पत्रकार परिषदेतुन मागणी

आष्टी. दि.१५ ऑक्टोबर रोजी वाळुंज येथील कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये माझ्या पत्नी प्राजक्ता धस यांना अडकवण्याचे षडयंत्र केले गेले आहे.यातील प्रसार माध्यमांमध्ये जोडतोड करून दाखवल्या गेलेल्या व्हिडिओ चित्रफितींचा वेळ आणि घटनाक्रम यांचा सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबद्वारा अत्यंत बारकाईने तपास करण्यात यावा.त्यातून वस्तुस्थिती बाहेर येणारच आहे.हा माझ्या पत्नी प्राजक्ता धस यांना या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला आहे.या घटनेमागे बोलविता धनी कोण आहे ? याचाही शोध घ्यावा अशी मागणी आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग,गणेश शिंदे,यशवंत खंडागळे आदि पदाधिकारी उपस्थित होते. आ.धस पुढे म्हणाले की,दि.१५ ऑक्टोबर रोजी घटना घडली आणि त्याची फिर्याद २१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पध्दतीने दाखल करण्यात आली.या मधल्या काळामध्ये काय काय घडवले गेले ? याचा शोध व्हावा कारण दि.१५ ऑक्टोबर रोजी आष्टी पोलीस ठाण्याच्या डायल ११२ या मोबाईल व्हॅन ला एका फोन द्वारे संपर्क करण्यात आला ती वेळ दुपारी ३.३० वाजताची होती या कालावधीमध्ये वाळुंज येथील रघुनाथ पवार हे बटईने करत असलेल्या शेत जमिनीतील मका घेऊन जात असलेल्या त्या लोकांशी वादविवाद झाल्यानंतर ४.१० वा.यावेळी रघुनाथ पवार यांनी धोका लक्षात घेऊन प्राजक्ता धस यांना फोन करून आपला जीव धोक्यात असल्याची माहिती दिली.त्यानंतर प्राजक्ता धस यांनी आष्टी पोलीस स्टेशनचे त्या भागातील बीटअंमलदार नवनाथ काळे आणि संतोष दराडे यांना फोन करून सांगितले.यावेळी हेतूपुरस्सर काढण्यात आलेल्या व्हिडिओमधील जे चित्रीकरण दाखवण्यात येत आहे ते चित्रीकरण दु.३.३० ते ४.१० या दरम्यानचे आहे. ४.१० ते ४.२५ पर्यंत आष्टी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना दोन वेळा फोन करण्यात आला आणि काहीतरी घटना घडण्याची शक्यता आहे तुम्ही काहीतरी करा असे सांगितले त्यानंतर रघुनाथ पवार यांना पोलीस येत आहेत असे सांगितले परंतु त्यांचा फोन बंद होता ४.४५ वाजता प्राजक्ता धस आणि आष्टी पोलीस स्टेशनचे कर्मचारी बरोबरच त्याठिकाणी पोहोचले यावेळी या लोकांनीच केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणातील तीन वेगवेगळे व्हिडिओ मधील संभाषण व्हिडिओ त्या लोकांनीच केलेले आहेत. हे व्हिडिओ रघुनाथ पवार किंवा इतर यांच्यावतीने करण्यात आलेले नाहीत. या ॲट्रॉसिटी प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी राहुल माणिक जगदाळे याला ही घटना समजताच तो घटनास्थळी पोहोचेपर्यंत डायल ११२ मोबाईल व्हॅनमधील पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले होते. त्यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांशी बोलून हा विषय संपवला होता परंतु या प्रकरणातील त्या दिवशी काढलेले तीन वेगळे वेगळे व्हिडिओ चित्रीकरण करून या चित्रफिती जोडतोड करताना घटनाक्रमाप्रमाणे असलेल्या तीन चित्रफिती खालच्या वर आणि उलट्या पालट्या क्रमाने सोयीस्कर रीतीने जोडतोड करून नियोजनबद्ध पद्धतीने एडिटिंग केलेल्या करून व्हायरल केलेल्या आहेत. प्राजक्ता धस या त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी घटना घडून गेलेल्या आहेत व्हिडिओ हे कटछाट करून दाखवले आहेत.या सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग ची शास्त्रोक्त पद्धतीने कधी ? केव्हा ? किती वेळ ? कुठे ? तयार केल्या आहेत याचा सायबर कायद्यानुसार तपास करण्याची गरज आहे.दि.१५ आक्टोबर रोजीच्या या प्रकरणातील कथित,पीडित लोक त्यानंतर सायंकाळी आष्टीतील सरकारी दवाखान्यात गेले आणि तेथून थेट अहमदनगरकडे गेल्याचे समजते.. तिकडे त्यांना कोणी बोलावले ? चित्रफिती कोणाच्या मोबाईल वरून व्हायरल करण्यात आल्या ? कोणी फॉरवर्ड केल्या ? ऑनलाइन फिर्याद देताना ॲपवर माहिती भरताना अशा प्रकारची तांत्रिक माहिती भरणे हे अडाणी आदिवासी असलेल्या पीडित लोकांना शक्य आहे असे वाटत नाही त्यामुळे माझ्या राजकीय कारकीर्दीला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीने एखाद्या गोरगरीब समाजाला हाताशी धरून कारस्थान करणाऱ्यांची तसेच या घटनेतील मास्टरमाईंड असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.अशाच प्रकारची तक्रार मागील काही दिवसांपूर्वी रघुनाथ पवार आणि राहुल जगदाळे यांच्याविरुद्ध याच मंडळींनी केली होती.त्याचाही तपास आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या