सरकाराकडुन गोरगरीब शेतकरी, ऊस तोड कामगारांच्या प्रश्न सुटेनात ; आता आपण मैदानात उतरुन पडणार नाही तर अनेकांना पाडणार ............. पंकजाताई मुंडे यांची भगवान भक्तीगडावरुन गर्जना .....भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसागर उसळला..
उत्तम बोडखे,(भगवान भक्तीगड)
---------------------
उन्हातान्हात राज्याच्या
कानाकोपऱ्यातून तुम्ही लाखोंच्या संख्येने आलात.तुमच्यासमोर मी नतमस्तक होते असे
सांगत शिवशक्ती भव्यतेकडून दिव्यतेकडे गेली.आपण आयुष्यभर राष्ट्रसंत भगवानबाबांच्या
आशीर्वाद आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला स्वाभिमान आणि संस्काराचा
मंत्र जपण्यासाठी अखंड रस्त्यावर राहू असा शब्द देत आपला आवाज कोणी दाबू शकणार
नाही!इथे सर्व समाजाचे लोक आले आहेत.ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय आपण
स्वस्थ बसणार नाही.तुम्ही उन्हात तळपत असताना सत्तेत आणि सावलीत बसणारे मुंडेंचे
रक्त असू शकत नाही ! असे भावनिक अन् सडेतोड स्पष्ट बोल सुनावत तुमच्यासाठी लोकनेते
मुंडेसाहेबांनी पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी सदैव रणांगणात उतरले आहे
असा रोखठोक इशारा देत सरकाराकडुन गोरगरीब शेतकरी,ऊस तोड कामगारांच्या प्रश्न
सुटेनात असा आरोप करीत आता आपण मैदानात उतरुन पडणार नाही तर पाडणार आहोत अशी गर्जना
भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव,माजी मंत्री तथा गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या
अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन केली.पाटोदा तालुक्यातील
सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या लाखो
जनसागरांच्या विराट जन्मसमुदायाला दसऱ्याच्या शुभेच्छा देत राष्ट्रसंत
भगवानबाबांच्या पवित्र मंचावरून दिला.दसरा मेळाव्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा
जपत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा भगवानगडावरून भगवान
भक्ती गडावर आल्यानंतर ही परंपरा पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच जबाबदारीने पार
पाडली.आजच्या दसरा मेळाव्याच्या मंचावरून सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरच्या
मंचावर संत भगवान बाबांच्या मूर्तीची विधिवत पूजा केल्यानंतर लाखो जनसागराला त्या
संबोधित करीत होत्या.मंचावर खा.डॉ. प्रीतमताई मुंडे,खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील,
माजी मंत्री महादेव जानकर,आ.नमिता मुंदडा,आ.मेघनाताई बोर्डीकर,आ.मोनिकाताई राजळे,
आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.शिवाजी कर्डिले,माजी आ.बाळासाहेब
मुरकुटे,रमेश आडस्कर,प्रकाशमामा महाजन, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,रिपाइंचे नेते
बाळासाहेब साळवे,समाजसेवक विजय गोल्हार,अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे, ह.भ.प.राधाताई
सानप महाराज,सर्जेराव तांदळे,सभापती सुवर्णाताई लांबरुड,माऊली जरांगे,रामराव
खेडकर,प्रकाश खेडकर,रामदास बडे,संतोष राख,ॲड,सुधीर घुमरे,ॲड.साहेबराव म्हस्के
आदीसह विविध मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रसंत भगवानबाबांनी दिला.ताईवर संकट येताच तुम्ही कोट्यावधी रुपये जमा
केले.ताई ज्योती प्रमाणे भासतात.या ज्योतीमध्ये सेवा करण्याची ताकद आहे.ताईंची
ज्योत आणि तुमची शक्ती भविष्यात इतिहास घडवेल असे सांगून विजयादशमीनिमित्त त्यांनी
शुभेच्छा दिल्या. या दसरा मेळाव्याच्या भव्य मंचावर खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे,
यशश्री मुंडे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील,माजी मंत्री महादेव जानकर,आ.सुरेश
धस,आमदार मेघनाताई बोर्डीकर,आमदार नमिता मुंदडा,माजी आ.शिवाजी कर्डिले,माजी
आ.भीमराव धोंडे,प्रकाशमामा महाजन,ह. भ.प.डॉ.पानेगावकर,आ.रत्नाकर गुट्टे, आमदार
मोनिका राजळे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,ह.भ.प.राधाताई सानप,सुवर्णाताई
लांबरुड,संदेश सानप,सतीश शिंदे,रमेश आडसकर,गोरख रसाळ,राजेंद्र मस्के,माऊली
जरांगे,सुधीर घुमरे,विजय गोल्हार,अजयदादा धोंडे,सर्जेरावतात्या तांदळे,मुरलीधर
ढाकणे,अरुण मुंडे,देविदास शेंडगे,रामचंद्र सानप आदीसह विविध क्षेत्रातील विविध
ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि भाविक भक्त उपस्थित होते.
* क्षणचित्रे*
---------
पंकजाताईची ज्योत आणि तुमची शक्ती भविष्यात इतिहास घडवेल असा आत्मविश्वास
खा.डाॕ.प्रीतमताईनी यावेळी दिला.
*भगवान भक्तीगड ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष इंजि.
संदेश सानप आणि सहकारी यांनी दोन्ही ताईचा सत्कार केला.
*गोपीनाथराव मुंडे ऊसतोड
मजूर संघटनेच्यावतीने तसेच आ.सुरेश धस,रमेश आडसकर इतरांनी तलवार देऊन सत्कार केला.
*देविदास शेंडगे यांनी पंकजाताईचा घोंगडी देऊन विशेष सत्कार केला.
*रामेश्वर गोरे व
सहकारी यांनी फळे भाजीची टोपली आणि विळा देऊन सत्कार केला.ही टोपली पंकजाताई यांनी
डोक्यावर घेऊन फोटोसाठी पोज दिली.
*मुस्लिम बांधवांच्यावतीने सलीम जहागीर आणि सहकार
यांनी सत्कार केला.
*सावरगाव घाट गावकऱ्यांच्यावतीने पंकजाताईचे
त्यांच्या अंगावर शहारे आले.
*राज्यभरातून संत भगवानबाबा आणि लोकनेते गोपीनाथराव
मुंडे यांचे भक्त उपस्थित होते.
*बीड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.ठाकूर यांच्या
मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
* उपस्थितांचे आभार समाजसेवक
विजय गोल्हार यांनी मानले.
************************
0 टिप्पण्या