Ticker

6/recent/ticker-posts

खिळद येथे शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन ; आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन किर्तन

आष्टी आष्टी तालुक्यातील खिळद येथे शारदीय नवरात्र महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील खिळद येथे शारदीय नवरात्र महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे १६ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहमध्ये पहाटे काकडा भजन,सकाळी देवीची आरती,दुपारी नवनाथ ग्रंथ वाचन,संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहामध्ये गहिनीनाथ महाराज (एकनाथवाडी),वैष्णवीताई मुखेकर महाराज (करंजी) यांचे कीर्तन झाले.बुधवारी प्राची ताई महाराज सरोदे (आळंदी),गुरूवारी राधाताई सानप महाराज (पाटोदा ),शुक्रवारी राजदीप आंधळे महाराज (आळंदी),शनिवारी मोनिकाताई खाडे महाराज (आळंदी), रविवारी गहीनाथ खेडकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.सोमवार दि.२३ ऑक्टोबर रोजी ह.भ.प.सुदर्शन महाराज सांगवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन किर्तन होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन खिळद ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या