Ticker

6/recent/ticker-posts

आहार,संस्कार,संगती यावरच आपलं जीवन अवलंबून असते ----ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज

आष्टी. अध्यात्म म्हणजे काय?अध्यात्माची जीवनात गरज कशासाठी? विज्ञानाच्या आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये भौतिक विकास खूप झाला परंतु मनुष्याला खरा जो लाभ आहे. प्रत्येकाला जीवनात सुखाची, समाधानाची,शांतीची,आनंदाची अत्यंत आवश्यकता आहे.पैसा खूप काही आहे परंतु सर्व काही नाही.पैशाने गादी विकत घेता येते पण झोप नाही,पैशाने अन्नपदार्थ विकत घेता येतात पण भूक नाही,पैशाने पुस्तके विकत घेता येतात पण ज्ञान नाही.मग जीवनामध्ये सुख,समाधानाची आवश्यकता आहे तर जीवनात अध्यात्माची खरी गरज आहे, अध्यात्म म्हणजे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला गीतेमध्ये आठच्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात पाच प्रश्न विचारले.त्यामध्ये अध्यात्मासंबंधी प्रश्न केलेला आहे.किम अध्यात्मम् अध्यात्म म्हणजे काय ? त्या अध्यात्माची परिभाषा भगवान सांगतात - जीवाला आणि जीवनाला जाणणे याचं नाव अध्यात्म आहे.अध्यात्माचा बाह्य जगताशी संबंध नसून आंतरिक संबंध आहे.आहार,संस्कार,संगती यावरच आपलं जीवन अवलंबून असते असे प्रतिपादन ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज यांनी केले. आष्टी शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेणाऱ्या जगताप क्लासेसच्यावतीने नवरात्रनिमित्त दि.१५ ते २३ आक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.या व्याख्यानमालेत पहिले पुष्प रविवार दि.१५ आक्टोबर रोजी ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज यांनी "अध्यात्म काळाची गरज " या विषयावर गुंफले. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डाॕ.मधुकर हंबर्डे , किसनराव रासकर,सौ.रासकरताई, सुभाष बोरुडे महाराज,भारत होले, कुलांगे सर,कांताराव धोंडे,जगताप क्लासेसचे संचालक प्रा.भा.दे.जगताप सर हे होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे म्हणाले की,जगताप क्लासेसचा नवरात्र शारदीय व्याख्यानमालेचा अंत्यत स्तुत्य उपक्रम आहे.पुर्वी आष्टी शहरात भव्य दिव्य शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन होत होते.गेली काही वर्षापासुन हा उपक्रम खंडीत झाला आहे.आता प्रा.जगताप यांंच्या प्रयत्नाने सुरु झाला.याचे अभिनंदन करत कौतुक केले. ह.भ.प.पुरी महाराज पुढे बोलताना म्हणाले की,जीवनाची उन्नतीसाठी या तीन गोष्टीची गरज असते.जीवनामध्ये कितीही प्रतिकुल परिस्थिती प्राप्त झाली तरी चांगली माणसं सोडायची नाहीत.तसेच चांगला उद्देश सोडायचा नाही.चांगली साधना सोडायची नाही. संगती ही तीन प्रकारची आहे. सुसंगती,कुसंगती,विसंगती, पुर्वपुण्याईने प्राप्त होत असते,कुसंगती प्रयत्नाने टाळावी लागते आणि विसंगती ही प्रारब्धाने भोगावीच लागते. आध्यात्माने मनुष्य जीवनात स्थिर राहतो. माणसाने शरीराची हालचाल जरुरा करावी.आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्यासाठी हालचाल करावी परंतु मन स्थिर करता आले पाहीजे.सुख आणि दुःख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.या दोन्ही बाजूचा अनुभव संसारात अडकलेला जीव सातत्याने घेत असतो.खरे म्हणजे सुख दुःखाची परीभाषा ही आपणच करीत असतो.अर्थात व्यक्तीनिहाय सुख दुःखाची परीभाषा ही वेगवेगळी असते.कोणाला एखाद्या घटनेत सुख वाटते तर कोणाला त्याच घटनेत दुःख वाटते.कोणी छोट्याशा घटनेत खूप सुख मानतो तर कोण छोट्याशा घटनेत अल्पसुख मानतो.बहुतांश लोक स्वतःच्या इच्छा, अपेक्षेप्रमाणे.घटणाऱ्या घटनेत सुख मानतात.त्याचबरोबर स्वतःच्या इच्छा अपेक्षांविरुध्द घडणाऱ्या घटनेत दुःख मानतात.संसारात. अडकलेला जीव प्रामुख्याने सुख दुःखाला स्वत:भोवती फिरवतो.इतरांवर आलेल्या दुःखाशी किंवा इतरांना प्राप्त होणाऱ्या सुखाशी अनेकांना देणे घेणे नसते.दुसऱ्याच्या दुःखात आनंद आणि दुसऱ्याच्या सुखात दुःख मानणारे भरपूर लोक समाजात आहेत.संसारात अडकलेल्या जीवापेक्षा संत महात्म्यांची सुख दुःखाची परीभाषा ही वेगळी व व्यापक आहे. इतरांचे दुःख पाहून संतांना दुःख होते आणि इतरांचे सुख त्यांना सुख होते.संसारात अडकलेल्या जीवाला त्याचा खरा परीचय व्हावा आणि हा जीव ईर्षा,द्वेष,मत्सर, अहंकार,काम, क्रोध, मी पणा,स्वार्थ, लोभ,माया आदितून बाहेर पडावा म्हणून आपण प्रयत्न करत असतांनाही आपल्या प्रयत्नांना पाहिजे तेवढे यश आले नाही. संसारात अडकलेल्या जीवाकडे पाहून आपणाला दुःख होत आहे. या दुःखाला देव नाहीसे करतो.स्वत:च्या जीवनात अनेक अडीअडचणी:असतांनाही त्याचे दुःख न मानता इतरांना त्यांचा खरा परीचय होत नसल्याने लोक दुःखी आहेत.म्हणून लोकांच्या या दुःखाबाबत दुःख मानणे आणि या सर्वांना या दुःखातून.मुक्त होण्याचा मार्ग दाखविण्याची विनंती आपल्या सर्वेश्वराजवळ करणे ही साधी बाब नाही.अर्थात स्वतःसाठी कांही न मागता इतरांच्या भल्यासाठी मागणे हा फार मोठा त्याग व फार मोठी सेवा आहे.संसारात अडकलेला जीव भोगाला महत्व देत असल्याने त्याला त्यागाची परीभाषा सहजासहजी समजणे तसे अवघड आहे. आपणाला असा त्याग करता नाही आला तरी चालेल,मात्र आपण भोगात अडकता कामा नये. प्रयत्नाने काहीही साध्य करता. येऊ शकते. आजकाल मुली व महिला खुप शिक्षण घेत आहेत,विविध विषयात,विविध तांत्रिक शिक्षणात दैदीप्यमान असे यश संपादन करत आहेत ही सर्वांसाठीच कौतुकाची गोष्ट आहे.हे सर्व यश संपादन करत असताना आपल्या भारतीय संस्कृतीचा खरच विसर पडलाय का ? हा प्रश्न मनाला सारखा सतावत असतो.आजकाल टीकली लावणे,बांगड्या घालणे,अंगभर कपड़े परिधान करणे,अध्यात्मिक विचार संपादन करणे,पुजापाठ करणे,एखादे स्त्रोत्र,पाठ करणे,ते सर्वासमोर म्हणुन दाखवणे हे सर्व दुर्मिळ होत चाललय आणि या सर्वांमुळेच आपल्या भारतीय संस्कृतीचा -हास होत आहे.फक्त फोटोसेशनसाठी महीला,मुल व मुली आपण कीती सुसंस्कृत आहोत आपल्याला कीती आपल्या संस्कृतिची आवड आहे हे सोशल मीडियावर दाखवण्यासाठी आणि असुरी समाधान मिळवण्यासाठीच करत असतात.खर तर यात आपण स्वत:लाच फसवत आहोत हे मात्र नक्की.आपण आजपर्यंत आपल्या आज्जी,आई, आत्या, काकु यांना पाहत आलोय या सर्व आपल्यासाठी नेहमीच आदर्श महिला ठरलेल्या आहेत.आल्यागेल्यांना प्रेमाने हव नको ते विचारण्यांची पद्धत, अतिथीचां सन्मान,भाषेत मृदूपणा,कुठेच दिखावा नाही,सणवार परंपरा,जपुनच यांनी आपल्याला घडवलय,मोठ केलं,यात आपल काय नुकसान झाल सांगा बर? या सर्व महिलांना उत्तम व्यवहारी ज्ञान होत,आहे,त्या उत्तम सुगरणी आहेत,सहनशील आहेत, दिसायलाही सुंदर आहेत,कुठेच गाजावाजा न करता त्यांनी त्यांच्या सर्व जबाबदारी उत्तम रितीने पार पाडल्या आहेत,आजही त्या कोणत्याही परीस्थितीला धैर्याने सामोरे जातात.मग प्रश्न पड़तो आपल कुठे चुकत?महत्वाच म्हणजे आपण मोबाइल आणि टीव्हीमुळे आपली संस्कृति विसरलोत. आपण सर्वांनी आपली संस्कृति कशी टिकुन राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, आज काल सर्वात डोकेदुखीचा विषय म्हणजे मोबाईल हा झाला आहे.मोबाईल वाईट नाही,पण त्याचा अतिरेक करणे,तासन् तास त्यातच एकाग्र होणे,जे कमी वयात पहायच नाही ते पाहणे,चार्जिंग संपली,नेट संपल की अस्वस्थ होणे,सैरभेर होणे,सतत एकटक पाहत राहणे,कंटाळा येईपर्यत बोलत राहणे, सेल्फीच्या नादात जीव गमावणे या सर्व गोष्टीं अतिशय वाईट व हानिकारक आहेत.आपली संस्कृती टिकेल,आपली मुलं मुलींना आपण योग्य दिशेला नेऊ शकु कारण आता नाही तर कधीच नाही एकदा वेळ निघून गेली की सारं संपत. आर्थिक दारिद्रय घालवणे सोपे असते,पण खऱ्या अर्थाने मानसिक दारिद्र घालवणे अत्यंत अवघड असते.हे अवघड असणारे पण अत्यंत आवश्यक असणारे कार्य संत,महात्मेच करू शकतात.ईर्षा,द्वेष, मत्सर,अहंकार,काम,क्रोध,माया,लोभ,विकार ही सर्व मानसिक दारिद्रयाची लक्षणे आहेत. संसारात अडकलेल्या जीवाला त्याचा खरा परीचय नसल्याने मानसिक दारिद्रयाची ही लक्षणे त्याच्याजवळ चिकटून बसलेली असतात.मानसिक दरिद्री माणूस आंप-पर, लहान-मोठा,स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत असे भेद पाळतो.भेदजन्य व स्वार्थी वृत्तीमुळे बऱ्याचवेळा असा माणूस मानवतेपासून दूर जातो.माणसाने मानवतेपासून दूर जाणे सर्वांसाठी घातक असते.ही घातकता नष्ट होण्यासाठी जीवाला त्याचा खरा परीचय होण्याची गरज आहे. ज्ञानोबा-तुकोबावर विश्वास असणाऱ्यांना त्यांचा खरा परीचय होण्यासाठी वेगळेपणाने कांही सांगण्याची आवश्यकता नसते असे शेवटी ह.भ.प.पुरी महाराज म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या