Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श शिक्षक बाबासाहेब मुळीक सर प्रभावशाली शिक्षकनेते

उत्तम बोडखे,आष्टी. -------------- पेरेल तेच उगवते.आपल्या कौटुंबिक अत्यंत पवित्र रसाळ आणि अध्यात्म वाणीतून कुटुंबाची योग्य दिशा आणि वाटचाल करणारे मुळीक परिवारात बाबासाहेब मुळीक सर यांच्या रूपाने एका शैक्षणिक क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्र या माध्यमातून नवी पेरणी केलेली आहे.सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक,वैचारिक,सांस्कृतिक आदिसह विविध क्षेत्रात आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण कार्याने नवी क्षितिजे निर्माण करणारे आदर्श शिक्षक बाबासाहेब मुळीक सर हे शिक्षण,साहित्य विश्वातील नामांकीत व्यक्तीमत्व आहे.शैक्षणिक क्षेत्रात २८ वर्षाहून अधिक काळ प्रभावशाली,गौरवशाली,निष्कलंक अशी कारकिर्द गाजवत नव्या पिढीतील आदर्श विद्यार्थ्थी,अनेक शिक्षकांना बाबासाहेब मुळीक सर यांनी घडविले.आज बुधवार दि.१५ आक्टोबर २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस आहे.त्यांंचे आज मित्र परिवाराच्यावतीने ,प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत आणि शिष्यगणांच्यासमोर अभिष्टचिंतन होणार आहे. ------------------------ आष्टी तालुक्यातील घाटा हे एक छोटे गाव.या गावात बाबासाहेब मुळीक सर यांचा सामान्य शेतकरी कुंटुंबात दि.१५ आक्टोबर रोजी जन्म झाला.ते बीड जि.प.चे प्राथमिक शिक्षक आहेत.आ.सुरेश धस यांचे ते नातेवाईक नाहीत पण महाविद्यालयीन जीवनापासून वर्गमित्र आणि म्हणून नुसता मित्रच नाही तर विश्वासू मित्र आहेत.शिक्षक या पदाची काही संहिता असते.या पदाचे काही संकेत असतात.काही शासनाने घालून दिलेले संकेत असतात.काही समाजाचे असतात,काही विद्यार्थ्यांचे असतात,काही मनाचे असतात.प्रत्येक शिक्षकाने आदर्शच असावे ही अपेक्षा असते.आदर्श हे एक शेवटचे टोक असते.तिथपर्यंत जाता येणे अवघड असते पण आदर्शाकडे वाटचाल करायची असते.आदर्शाला मैलाचा दगड समजून त्या रस्त्याने पाय उचलायचे असतात.शिक्षकाने शाळेतच आदर्श असून पुरेसे नसते.शिक्षकाने रस्त्याने आदर्श दिसले पाहिजे.शिक्षकाने मुलांसाठी तर आदर्श असावेच पण शिक्षकाने मुलांच्या पालकांसाठीही आदर्श ठरावे.शिक्षक समाजाचा केंद्रबिंदू असावा.बाबासाहेब मुळीक माझाही काॕलेजमधील मित्र आहे.बाबासाहेब मुळीक यांनी डी.एड.केले.शिक्षक झाले. डी.एड.नंतर बी.ए.ही झाले.त्याचबरोबर त्यांचे मित्र सुरेश धस बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले.सुरेश धस आमदार झाले.त्यांनी मैत्रीची आठवण ठेवून बाबासाहेब मुळीक यांना बीड जिल्हा परिषदेचे पाच वर्षासाठी स्वीकृत सदस्य केले होते.मनुष्याने आयुष्यभर विद्यार्थी असावे असे म्हणतात.शिक्षकाने तर नक्कीच आयुष्यभर विद्यार्थी असावे.एकदा बी.ए.होऊनही बाबासाहेब मुळीक सर यांचे समाधान झाले नाही.तो चार वेळा वेगवेगळे विषय घेवून बी.ए.झाले.बी.ए.साठी तीन विषय असतात.बाबा मुळीक १२ विषयात बी.ए. झाले आहेत.ते ही बहिःस्थ (एक्सटर्नल) म्हणूनच.बाबासाहेब मुळीक यांच्या पत्नी सौ.आशा मुळीक - पोकळे याही तीनवेळा बी.ए.,इंग्रजी,इतिहास, मानसशास्त्र हे तीन विषयात विशेष प्राविण्यासह एम.ए.उत्तीर्ण आहेत.त्याचबरोबर हिंदी आणि मराठी विषय घेऊन दोन वेळा बी.एड.उत्तीर्ण आहेत.बाबासाहेब मुळीक सरचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या पत्नी दहावी उत्तीर्ण झाल्या होत्या.पत्नीच्या पुढील शिक्षणासाठी बाबासाहेब मुळीक सर यांनी त्यांना प्रेरणा दिली.स्री शिक्षणाला स्वतःच्या घरापासून सुरुवात केली.ही विशेष बाब आहे.बाबासाहेब मुळीक आणि सौ.आशा मुळीक सर हे दोघेही आदर्श शिक्षक आहेत.या पतीपत्नीने आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले आहे.बाबासाहेब मुळीक सर चार वेगवेगळ्या विषयात एम.ए.झाले.मराठी, इतिहास,राज्यशास्त्र,समाजशास्र,शैक्षणिक व्यवस्थापन या पाच विषयात त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली आहे.एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत.त्यांनी शिक्षकी व्रताला ज्या पदव्या लागतात त्या घेतल्या.ते डी.एड.झाला.त्यानंतर डी.सी.एम.झाला.मराठी बी.एड.झाला.हिंदी शिक्षा विशारद म्हणजे हिंदी घेवून पुन्हा बी.एड.समकक्ष पदवी घेतली.आता ते प्रबंधाचे काम करतात.१५ पदव्या घेणारा प्राथमिक शिक्षक आहे.डाॕ.श्रीकांत जिचकरांनी वेगवेगळया विद्याशाखेच्या अनेक पदव्या मिळविलेल्या होत्या.त्यांच्या नावाने विश्वविक्रम केला होता.बाबासाहेब मुळीक यांचा १५ पदव्या घेण्याचा महाराष्ट्र विक्रम आहे.काँग्रेसचे जेष्ठनेते भीमराव साके हे बाबासाहेब मुळीक यांचे मामा आहेत. मामाच्या घरी राहत होता.साकेमामा तत्कालीन आमदार धोंडेसाहेबांचे जवळचे मित्र असल्यामुळे बाबा आष्टी दुध संघात नौकरीस होता.काॕलेजमध्ये शिक्षण घेत आसतानाच नौकरी? हे राजकारणात होतं असते.मामामुळे त्याला तालुका दूध संघात नौकरी मिळालेली होती.दूध संघात नौकरी करुन बाबासाहेब मुळीक काॕलेजमध्ये राजकारण करीत राहिला.आ. धोंडेसाहेबांच्या समर्थक विद्यार्थीचे पॕनलविरुध्द आ.धस यांच्या बाजुने राहायचा म्हणुन त्याला त्रासही झाला.नौकरी सोडुन द्यावी लागली.महाविद्यालयात विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत मुळीक सुरेश धस यांच्या गटात सक्रीय असायचे.धस आणि बाबासाहेब मुळीक हे दोघेही निवडूण आले.सुरेशरावांच्या बाजुने संख्याबळ कमी होते.सुरेश धस यांना अध्यक्ष होण्यासाठी विरोधी गटात निवडुन आलेलो मी ...मला पळवुन घेऊन जाण्याचा डाव आखणारा हा बाबासाहेब मुळीक,अतुलशेठ मेहेर,शहाराम लोखंडे, स्व.सुर्यकांत तरटे,विठ्ठल नरवडे रविकांत सुंबरे आदि मित्रांचा डाव यशस्वी झाला. धस -मुळीक दोघांची मैत्री आजतागायत ३४ वर्षे टिकून आहे. ज्याचे प्रेम जगावर असते.तो कर्माने भक्कम असतो,ज्ञानी असतो, वाणीने मधुर,हृदयाने भाग्यवान,कर्माने मजबूत व प्रेमाने भिजलेला असतो.हाच खरा सुखी व भाग्यवान माणूस असतो.साधी राहणी,उच्च विचार,कुटुंबवत्सल आणि प्रेमळ स्वभाव इतरांना मदत करण्याची नेहमी मनात भावना असणारे आदर्श शिक्षक बाबासाहेब मुळीक आहेत.शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द,चिकाटी व अथक परिश्रम यांच्या जोरावर समाजात आपला नावलौकीक निर्माण केला.शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावी काम केले. आपले संपूर्ण कुटुंबाला शिक्षण दिले.जगामध्ये सर्वात मोठे ज्ञानाचे केंद्र कोणते असेल तर ती म्हणजे शाळा.ज्ञान दिल्याने वाढते घेतल्याने शहाणपण येते.अज्ञान नष्ट होते.ज्ञानामुळे स्वाभिमान तर येतोच पण त्याचबरोबर शिस्तसुध्दा आपण शिकतो कारण ज्ञान हे अमृत आहे.त्याचा योग्य उपयोग कसा करावा.हे ज्याला कळले तोच खरा ज्ञानी असतो.प्रत्येकाने वाचायला शिकले पाहिजे.वाचन हे आपल्याला घडवते पण जो वाचतो तो संकटावरचे उपाय शोधू शकतो.अचूक निर्णय घेऊ शकतो पण यासाठीच आपण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.पुस्तकांशी मैत्री करावी.मित्र हे स्थलकालानुसार बदलतात.माणसांशी असणारी मैत्री कधी तुटू शकते.माणसात गैरसमज निर्माण होऊन नाते तुटू शकते पण पुस्तकांशी असणारी मैत्री कधीही तुटू शकत नाही.पुस्तक वाचण्याचा छंद सर्वोत्तम छंद आहे.बाबासाहेब मुळीक सर यांना हा वाचनाचा मोठा छंद आहे. आदर्श शिक्षक तथा शिक्षक नेते बाबासाहेब मुळीक सर यांना वाढदिवसानिमित्त झुंजारवार्ता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या