
आष्टी.
आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमीन घोटाळा बाहेर काढल्याने सामाजिक
कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार राम खाडे यांनी
स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.जमीन घोट्याळ्यातील बड्या
आरोपीकडून माझ्या जीवाला धोका असल्याचेही राम खाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान भाई ठाकुर आमदार आहेत मात्र एका हत्येच्या प्रकरणात ते अनेक वर्ष आतमध्ये
होते.राजकीय आयुष्यातही त्यांना त्याचे परीणाम भोगावे लागत आहे.त्यामुळे असे प्रकार
व्हायला नकोत.आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पोलीस अधिक्षकांकडे
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,९ ऑक्टोबर २०२३ रोजी आष्टीहन मुंबईकडे माझे वाहन
क्रमांक एम.एच.२३ -३०४४ ने जात असतांना एक जीप माझा पाठलाग करत होती.त्यामुळे
अंभोरा पोलीस ठाण्याचे एपीआय ढाकणे यांना फोन केला.त्यांनी पेट्रोलिंगची गाडी
माझ्या मदतीला पाठविली.त्यानंतर ती गाडी माझा पाठलाग करत राहीली.त्यानंतर ११२ ला
कॉल केला असता अहमदनगर पोलीसांना कळविले.तरीही गाडी माझा पाठलाग करत होती.त्यानंतर
सुपा येथील पोलीसांनी मला मदत केली.जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपीचे काही बगलबच्चे
माझ्या वाहनाचा पाठलाग करत असल्याचे समजते.हा बगलबच्चा सुध्दा एका देवस्थान जमिन
प्रकरणात आरोपी आहे.या जमिन घोटाळ्यात अनेक बड्या राजकीय लोकांचा समावेश आहे. त्यात
त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत.मात्र सरकारच्या दबावाखाली तपास सुरू असुन एका
एका आरोपीला अटक करण्यात येत आहे.मी आरोपींच्या जामिनीकरीता विरोध करू नये,
त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवुन खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.माझ्या जीवाला
धोका आहे.मी समाजाच्या हिताचे काम करत आहे.माझ्या तक्रारीमुळे या भुखंड माफियांचे
कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे.त्यामुळे ते कोणत्याही स्तरावर जाऊ
शकतात.यामध्ये अधिकारी सामील आहेत असे खाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.मला
औरंगाबाद-पुणे-मुंबई येथे सातत्याने जावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी पोलीस
संरक्षण घेवुन जाण्यास परवानगी देण्यात यावी व गुप्त वार्ता विभागास सतर्क
राहण्याचे आदेशित करावे असेही राम खाडे यांनी पोलीस अधिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे
केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
0 टिप्पण्या