
आष्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आष्टी तालुका अध्यक्षपदी आष्टी पंचायत समिती सदस्य आणि आष्टी दुध संघाचे माजी चेअरमन परमेश्वरकाका शेळके यांची तर बीड जिल्हा सरचिटणीस म्हणून ॲड.संजय थोरवे यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आदेशावरून बीड जिल्हा अध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी परमेश्वरकाका शेळके आणि संजय थोरवे यांची निवड केली आहे.आज बीड येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वसामान्य तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवणे आणि गोरगरीब जनतेच्या उत्थानासाठी आपण काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपणास संधी देण्यात आले आहे असे या नियुक्ती पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.बीड जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करणार आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण शासन पातळीवर खंबीरपणे शेतकऱ्यांचे पाठीशी उभे राहणार आहोत असे यावेळी नवनियुक्त आष्टी तालुका अध्यक्ष परमेश्वरकाका शेळके यांनी सांगितले. तर शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांचे जिल्हा पातळीवर आष्टी तालुक्यातील प्रलंबित असलेली कामे शासन पातळीवरील अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि शरदचंद्र पवार यांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया ॲड.संजय थोरवे यांनी दिली.
यावेळी त्यांचेसोबत धानोरा येथील डॉ.राज शेख,पांडुरंग चव्हाण,माजी सरपंच देविदास उदावंत,राहुल शेळके,ग्रामपंचायत सदस्य अशोक मस्के,राम गायकवाड, सागर ढोबळे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या