आष्टी.
भारतीय स्वातंत्र्य आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आष्टी
तालुक्यातील शालेय स्तरावर अमृत कलश यात्रा सांस्कृतिक स्पर्धे अंतर्गत गीत गायन
स्पर्धेमध्ये आष्टीच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या संघाने प्रथम पारितोषिक
पटकावले.द्वितीय पारितोषिक गणेश विद्यालय आष्टी आणि तृतीय पारितोषिक वसुंधरा
विद्यालय आष्टी या शाळेच्या गीत गायन संघाने पटकावले.उत्तेजनार्थ प्रथम,केंद्रीय
प्राथमिक शाळा आष्टी नं.१,द्वितीय जि.प.माध्यमिक शाळा टाकळसिंग आणि तृतीय
जि.प.प्रा.शा.वाळुंज या प्रशालेतील संघाने यश प्राप्त केले आहे.आष्टी पंचायत
समितीच्या सभागृहामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सुरुवातीस तालुक्यातील
१२५ गावांमधून अमृत कलश आणण्यात आले आणि सर्व कलश एकत्रित करून तालुक्याचा एक कलश
तयार करून मान्यवरांच्या हस्ते तो प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी
उपस्थित शिक्षक,पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक आणि स्पर्धक विद्यार्थ्यांनी
पंचप्राण शपथ घेतली.शालेय विद्यार्थ्यांच्या या गीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक
म्हणून श्री आदिनाथ आवटे श्री विशाल चव्हाण आणि श्री बनसोडे या शिक्षकांनी काम
पाहिले.या कार्यक्रमांमध्ये ११ शाळेतील विद्यार्थी गीत गायन संघाने सहभाग नोंदवला
आणि प्रत्येक शाळेने राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन केले.सर्व स्पर्धकांनी अत्यंत
सुंदर असा कलेचा अविष्कार घडवला यावेळी परीक्षकांनी देखील आपल्या गीत गायन करून
स्पर्धेचा समारोप केला.बलसागर भारत होवो हे भूप रागातील देशभक्तीपर गीत
संवादिनी,तबला,खंजिरी आणि इतर संगीतमय साधनांच्या साथीने कन्या प्रशालेतील
विद्यार्थिनींनी सुरेल आणि उत्कृष्टरित्या सादर केले.या गीतामध्ये वेदिका
तावरे,पूजा भोईटे,ज्ञानेश्वरी केरुळकर,तेजस्वी हंबर्डे,कुलकर्णी,राजूरकर,वैष्णवी
हंबर्डे,सानिका पानतावणे,या विधर्थिनींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट देशभक्ती गीत सादर
केले.कन्या प्रशालेतील माध्यमिक शिक्षक सतीश दळवी यांच्या मार्गदर्शनात हे गीत सादर
झाले तर तबला वादक संजय ससाणे यांनी साथ दिली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार
सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले.
चौकट
----------
आष्टी येथील केंद्रीय
प्राथमिक शाळा नंबर १ चे सहशिक्षक बाळासाहेब तळेकर यांनी अनेक शासकीय सांस्कृतिक
आणि सामाजिक कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये विशेष कौशल्य पूर्वक सूत्रसंचालन
केल्याची पावती म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि विशेष
प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
0 टिप्पण्या