Ticker

6/recent/ticker-posts

माणसातील पोलीस आणि पोलिसातील माणूस सतत जागा असावा ...... प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे " समाज आणि पोलीस यांचे एकमेकांना सहकार्य असावे ......... पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस

आष्टी. पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि जनतेमध्ये सतत सुसंवाद असला पाहिजे असा सुसंवाद आष्टी पोलीस स्टेशन मधील कार्यरत अधिकारी आणि आष्टी येथील सजग असलेले नागरिक यांचा सुसंवाद असल्यामुळेच.श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण अत्यंत गुण्यागोविंदाने साजरे झाले असून माणसाच्या मनामधील पोलीस आणि पोलिसांमधला माणूस सतत जागा असला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी केले.तर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि जनतेचे प्रतिनिधी,सर्वसामान्य जनता यांचे एकमेकांच्या सहकार्य शिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही असे प्रतिपादन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी केले. आष्टी नगरपंचायत कार्यालयाच्यावतीने गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण अत्यंत सामाजिक सौहार्द,सामाजिक सामंजस्य आणि अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये पार पडले याबद्दल पोलीस प्रशासन,नगरपंचायत प्रशासन यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल सत्कार समारंभ नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित केला होता यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्री संतोष खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे नगरपंचायतचे मुख्य अधिकारी बाळदत्त मोरे,व्यापारी महासंघाचे संजय मेहेर आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.. पुढे बोलताना प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे म्हणाले की,आष्टी येथील श्री गणेशोत्सवास प्राचीन परंपरा लाभलेली असून साधारणतः ११५ वर्षांपूर्वी आष्टीतील प्रसिद्ध कसबा गणपती मंडळ आणि पेठ गणेश मंडळ यांच्यामध्ये कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला असता हे प्रकरण तत्कालीन निजाम राजवटीमध्ये हैदराबाद येथे उच्च न्यायालयामध्ये दाखल झाले त्यावेळी पेठ गणेश मंडळाचे कार्यकर्ते बैलगाडीने हैदराबादला गेले आणि काही दिवस राहून स्वतंत्ररित्या अकराव्या दिवशी श्री गणेश विसर्जनाची परवानगी मिळवली आणि परतले तेंव्हा पासून सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी पेठ गणेश मंडळाच्या श्रीगणेशाचे विसर्जन होते.आष्टी येथील नागरिक अत्यंत समंजस असून सन १९९२ साली पोलीस बंदोबस्ता शिवाय श्रीगणेश विसर्जन मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडली आहे.हा अविस्मरणीय इतिहास आहे काही किरकोळ अपवाद वगळता,आष्टीतील सामाजिक सलोखा चांगला राहिलेला आहे याचे कारण म्हणजे आ.सुरेश धस यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आष्टी येथील सामाजिक आणि राजकीय रचना केली असून सर्व समाजाबरोबरच मुस्लिम समाजाचे सहा नगरसेवक भारतीय जनता पार्टी द्वारे निवडून आणले आहेत त्यामुळे आष्टी शहरांमध्ये अत्यंत सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे. पोलीस या शब्दाचा अर्थच असा आहे P पोलाइट, O ओबेडियंट, L लाॅयल, I इंटेलिक्चुअल, C कॅरेक्टर आणि E एलिजिबल असा असल्यामुळे हे गुण सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील असतात त्यांनी त्याचा वापर करावा आणि पोलीस कर्मचाऱ्यांमधली माणुसकी त्यांनी सतत जपली पाहिजे असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस म्हणाले की, आष्टी पोलीस स्टेशन मध्ये उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून देखील सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कर्तव्य दक्षतेने कामाचा अतिरिक्त ताण घेऊन अत्यंत मन लावून श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या कार्यक्रमांमध्ये अत्यंत मेहनत घेऊन सामाजिक शांतता राहावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत हे टीम वर्क असून मी या पोलीस कर्मचारी संघाचा प्रमुख आहे परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्न केल्यामुळे आपण यशस्वी झालो आहोत त्यामध्ये सहकार्य असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब गोसावी पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे,पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे यांच्या सह सर्वच अंमलदार,नाईक,त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी भगिनी,यांनी अतिरिक्त काम करून हे दोन्ही सण अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडण्यास मदत केली आहे.आष्टी येथे नव्याने पदभार घेऊन देखील चांगले काम करता आले याचे सर्व श्रेय माझ्या कर्मचारी वर्गाला असल्याचे सांगून त्यांनी सध्याची सामाजिक स्थिती विचार करण्यासारखी असल्याचे सांगून फेसबुक आणि इंस्टाग्राम वर चांगल्या ऐवजी वाईट कामे होत असून समाजाने यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.गणेशोत्सव हा अत्यंत संवेदनाशील सण असून या काळात कुठेही अनिश्चित प्रकार घडल्यास संपूर्ण समाज त्यासाठी वेठीस धरला जातो त्यामुळे आम्हाला अत्यंत काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून या काळामध्ये काम करावे लागते. समाजाच्या सहकाऱ्या शिवाय पोलीस कर्मचारी काहीही करू शकत नाहीत त्यामुळे सर्व नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि आम्ही देखील यापुढेही आणखी चांगले काम करण्यास वचनबद्ध आहोत असे सांगितले.यावेळी बोलताना व्यापारी महासंघाचे पदाधिकारी संजय मेहेर म्हणाले की,देशाच्या सीमेवर जवान ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने पोलीस समाजामध्ये राहून काम करतात आपण झोपलेले असतो त्यावेळेस पोलीस जागे असतात त्यामुळे आपण अत्यंत सुरक्षित राहत आहोत हे त्यांचे अत्यंत पवित्र कार्य असून समाजामध्ये सामाजिक शांतता ठेवण्याचे मोठे कार्य पोलीस विभागाकडून होत असते त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत असे सांगितले.प्रास्ताविक करताना ज्येष्ठ नेते रंगनाथ अण्णा धोंडे म्हणाले की,पोलीस विभागाने कर्मचारी यांनी अत्यंत चांगले काम केल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचा नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने कौतुकाची थाप देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी सत्काराचे आयोजन नगरपंचायत द्वारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.. यावेळी पोलीस अधिकारी आणि सर्व कर्मचारी नगरपंचायतचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य खंडू जाधव,व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष शादुल्लाशेठ बेग (टाटा),सुनीलशेठ मेहेर,सादिक कुरेशी, अमोल शेठ भंडारी,डाॅ.सल्लाउद्दीन बेग,पत्रकार अविशांत कुमकर, प्रवीण पोकळे,अण्णासाहेब साबळे सचिन रानडे,शरद गर्जे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले तर आभार
उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे यांनी मानले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नगराध्यक्ष जिया बेग गटनेते किशोर झरेकर,सुनील रेडेकर,शेख शरीफ,इंजि.आतहर बेग, इंजि.गहिनीनाथ सिरसाट,सोमनाथ साखरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या