
आष्टी.
आष्टी येथे अजयदादा धोंडे आणि अभयराजे धोंडे यांंच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बाबाजी गणेश मंडळाच्या बाप्पाची १० दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर माजी आ.भीमराव धोंडे यांनी विसर्जन मिरवणूकीत ढोल वाजवत शेकडो गणेशभक्तांनी,
कार्यकर्त्यांनी ठेका धरत
धुम धडाक्यात बाबाजी गणेश मंडळाच्या बाप्पाला निर्विघ्न निरोप दिला.माजी आ.भीमराव धोंडे यांनी गणरायांची पूजा करून आष्टी विधानसभा मतदार संघात " सुख, शांती नादू दे "विघ्नहर्ता बप्पा सर्वांचे दुःख निवारण कर ,अशी प्रार्थना बाप्पा चरणी करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर..या असे म्हणत बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी केली.आष्टी शहरात मागील अनेक वर्षापासून माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवानेते अजयदादा धोंडे यांच्या नेतृत्वाखालील अभयराजे धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बाबाजी गणेश मंडळ सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. समाजापुढे वेगळा आदर्श ठेवत आहे.कीर्तनातून जनजागृती, त्याचबरोबर हिंदू- मुस्लिम तसेच सर्व समाज बांधव मिळून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा- कायम आहे.१० दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दि.२७ रोजी निघाली गणेश मंडळाच्या वाजणा-या बेंजोवर शेकडो गणेश भक्तांनी ठेका धरला होता.श्रींच्या मुर्तीच्या रथाला आकर्षक सजावट करण्यात आली होती.अंधार पडत गेला तसा भक्तांचा उत्साह वाढत गेला किनारा चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनि मंदिर चौक तुडुंब गर्दीने भरला होता.श्री विसर्जन मिरवणूक शनिचौकात येताच माजी आ.भीमराव धोंडे दाखल झाले.ढोल वाजवत शेकडो गणेशभक्तांनी त्यांच्या तालावर ठेका धरला.यावेळी त्यांनी गणरायाची पूजा करून मतदार संघात सुख,शांती नादू दे' विघ्नहर्ता बप्पा सर्वांचे दुःख निवारण कर अशी प्रार्थना बाप्पा चरणी करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे,बाबाजी गणेश मंडळाचे अध्यक्ष अभयराजे धोंडे, उपाध्यक्ष अस्ताक शेख,बाबाजी गणेश मंडळाचे पदाधिकारी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या