आष्टी.दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यात दुग्धव्यायसामुळे शेतकरी
वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५
वर्षांपासून आष्टी तालुका दुध संघ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.तालुक्यात पाऊस कमी
प्रमाणात होत असल्यामुळे शेती उत्पन्न हमखास होईलच याचा भरवसा राहिला नाही
.त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता. त्या शेतकऱ्यांना जोड धंदा म्हणुन
दुग्धव्यावसायाकडे आकर्षित करण्यास आ.धस यशस्वी ठरले.आष्टी तालुक्यामध्ये इतर
खाजगी दूध संकलन केंद्रापेक्षा आष्टी तालुका दूध संघ सर्वाधिक ३४ रुपये लिटर
प्रमाणे दुधउत्पादक शेतकऱ्यांना दर देत असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन शांतीलाल
भोसले यांनी दिली.आष्टी तालुका दूध संघामार्फत दररोज एक लाख लिटर पेक्षा जास्त दूध
संकलन केले जात असून दोन वेळा दूध संकलन करणाऱ्या दुध दुध संघ दूध उत्पादकांना
प्रति लिटर ३४ रुपये इतका दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार
झाले आहे.दोन वेळा दूध संकलन होत असल्याने स्वच्छ निर्भेळ दुधाचा पुरवठा होत
असल्याने हा दर मिळत आहे.आष्टी तालुका दूध संघामार्फत आष्टी व अंभोरा या दोन ठिकाणी
सध्या दोन वेळा दूध संकलन होत आहे.३.५ फॅट व ८.५ एस एन एफ या दुधाच्या गुणवत्तेला
३४ रुपये भाव मिळत आहे तर त्या पुढील प्रत्येक पॉईंटला ४० पैसे वाढीव दर मिळत आहे.
आज अनेक शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार ४० ते ४५ रुपये हा दरही मिळू लागल्याने
शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे येत आहेत. इतर खाजगी दूध संकलन केंद्रापेक्षा आष्टी
तालुका दूध संघ तब्बल तीन रुपये लिटर जास्तीचा दर देत आहे.आष्टी तालुका दूध संघ आ.
सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक
योजना राबविल्या जात आहेत.गेल्या काही वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यामध्ये मुरघास ही
संकल्पना आ.धस यांनी राबवली. त्या योजनेचे प्रात्यक्षिकही हातोळण येथे घेण्यात आले
होते.त्यामुळे आष्टी तालुक्यामध्ये आज हजारो टन मुरघास तयार झाला असून कसदार व
गुणवत्तापूर्व दुधासाठी हा मूरघास जनावरांना लाभदायी ठरत आहे .आष्टी तालुका दूध
संघामध्ये भेसळ तपासणीसाठी अत्याधुनिक अशी एफटी वन ही जवळपास एक कोटी रुपयाची मशीन
आहे. या मशीनमध्ये विविध प्रकारच्या दुधाच्या तपासण्या होत आहेत.

या मशीनवरच सर्व
तपासण्या करून दूध स्वीकारण्यात येत असल्याने स्वच्छ निर्भेळ आणि भेसळ नसलेले दूध
आष्टी तालुका दूध संघात येत असल्याचे चेअरमन शांतीलाल भोसले यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या