

आष्टी.
आष्टी तालुक्यातील १९७४ साली स्थापन झालेली आणि पुढील वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था आहे.ही दरवर्षी २७५ कोटी रु.ची उलाढाल करणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षकांची पतसंस्था असल्याचे असे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन मारूती पठाडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या ४९ व्या.वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रास्ताविक करताना ते बोलत होते.
या संस्थेच्या वार्षिक सभेसाठी उपस्थित राहून आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे, बीड जि.प.
माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,माजी शिक्षण सभापती उद्धव दरेकर,प्रा.मधुकरआबा राळेभात,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल सहस्त्रबुद्धे, उत्तम बोडखे,जि.प.चे माजी स्विकृत सदस्य बाबासाहेब मुळीक,मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादा चितळे,पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाष भादवे यांनी या शिक्षक पतसंस्थेच्या कामाचे कौतुक करून संस्थेचे पदाधिकारी आणि संचालक तसेच उपस्थित सभासद शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना संस्थेचे चेअरमन मारूती पठाडे म्हणाले की,१९७४ साली या स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली.त्यावेळेपासून भास्करराव सरदेशमुख,एस.आर.पाटील,सुरेश पवार यांनी केलेल्या अथक परिश्रमातून या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे.त्यांनी या पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी प्रचंड मेहनत घेऊन संस्थेचा कारभार अत्यंत काटकसरीने पारदर्शी पद्धतीने केल्यामुळे सर्व शिक्षकांच्या विश्वासपात्र असा या संस्थेने लौकिकप्राप्त केला आहे. शिक्षकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी,मदतीसाठी हितासाठी ही पतसंस्था सतत काम करेल असा विश्वास देऊन ते पुढे म्हणाले की,या विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे १००२ सभासद असून संस्थेचे भाग भांडवल २४ कोटी रु.असून सभासदांचे शेअर्स १७ कोटी रु. तसेच कायम ठेवी ६ कोटी रू.एकूण ठेवी ३९ कोटी रू.मुदत ठेवी ३६ कोटी रू.आवर्ती ठेव ३ कोटी रू.आणि एकूण सभासदांचे कर्ज ७५ कोटी रू.आहे.संस्थेचा निव्वळ नफा २ कोटी रु.आहे. शिक्षक सभासदांना २५ लक्ष रु.कर्ज मर्यादा असून त्यासाठी केवळ ८.५ टक्के इतका व्याजदर आकारला जात आहे.या पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के एवढा लाभांश वाटप करण्यात येतो असे सांगून आजची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ४९ वी.आहे. आज या निमित्ताने राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक,बीड जिल्हा परिषदेने सन्मानित केलेले आदर्श शिक्षक,पतसंस्थेच्यावतीने निवडण्यात आलेले ३३ आदर्श शिक्षक,तीन उपक्रमशील शाळांना पुरस्कार, पीएचडी प्राप्त २ शिक्षक, नेट सेट उत्तीर्ण ५ शिक्षक यांना संस्थेतर्फे गौरवण्यात येणार आहे. १६ सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांना आज निरोप देण्यात येणार आहे.पुढील वर्षी
संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने सप्टेंबर २०२४ मध्ये संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मान्यवर शिक्षण तज्ञ यांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला आ.सुरेश धस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अण्णासाहेब घोडके,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोरा,बीड जिल्हा परिषदेने गौरविलेले आदर्श शिक्षक सुरेश नरोड जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,दत्तात्रय राऊत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चकलांबा आणि डॉ.सतीश सायंबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोडी,विद्यावाचस्पती (पीएचडी ) प्राप्त नागेश जायभाय आणि श्रीमती अनिता उत्तम चव्हाण- ठाकूर यांना मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे ,माजी आ.भीमराव धोंडे,उध्दवबापु दरेकर ,शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे ,गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,प्रहार संघटनेचे नेते जाधव यांची समयोजीत भाषणे झाली.
स्वामी विवेकानंद शिक्षकांचे सहकारी पतसंस्थेच्या ४९ व्या. वार्षिक सर्व साधारण सभेसाठी आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे,बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,
आष्टीचे गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे,जामखेड येथील प्रा.मधुकरआबा राळेभात,माजी जिल्हा परिषद सभापती उद्धव दरेकर,सभापती बद्रीनाथ जगताप,माजी सभापती दत्ता जेवे,अण्णासाहेब चौधरी,अनिलतात्या ढोबळे,सुनील नाथ,बाबासाहेब मुळीक,दादा चितळे या प्रमुख मान्यवरांसह संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भादवे,
मानसचिव गहिनीनाथ तोतरे,संचालक महेश शिंदे,संदीप खराडे,शिवाजी खुडे,
बापूसाहेब फसले,ज्ञानदेव भुकन,
अल्ताफ शेख,दिलीप उढाणे,महादेव आमले,विठ्ठल शिंदे,सचिन वारंगुळे,
विकास मेहत्रे, शिवाजी पांढरे,श्रीमती सुनीता झांजे गांगर्डे,श्रीमती रूपाली उगले कोरडे,ज्योतीराम देसाई ,वैजिनाथ रायते,पत्रकार प्रवीण पोकळे, अविशांत कुमकर,शरद गर्जे हे हजर होते या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर आणि अशोक उढाणे यांनी तर आभार सुभाष भादवे यांनी मानले.
---------------------
0 टिप्पण्या