उत्तम बोडखे,आष्टी.
--------------
रंगभूमीवरील कलाकार हा समाजाचा घटक असतो.
कलाकाराला स्वतःचा विचार असतो आणि सामाजिक प्रक्रियेत त्यांची ही एक भूमिका असते.
समाज समृद्ध करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजनातून कलाकारांनी विचारांची
धुरा वाहायला हवी.या दृष्टीने मनात सतत विचार आणि वेग ठेवून आपल्या भूमिकेला न्याय
देणाऱ्या महाराष्ट्राच्या सृष्टीतील अत्यंत लाघवी शांत,संयमी आणि तितक्याच
हजरजबाबी सामाजिक भान घेऊन चालणार्या समृद्ध विचाराच्या देखण्या अभिनेत्री म्हणून
सोनाली कुलकर्णी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.सोनाली कुलकर्णी या मराठी चित्रपट
अभिनेत्री म्हणून आज मी तिला यशोशिखरावर आहेत.त्यांच्या शब्दातील ताकद निखळ
मनोरंजनाचा त्याला असलेला बाज त्यातून विविध भूमिका करत असताना त्या भूमिकेला
दिलेला न्याय या सर्व अंगांनी आणि बाजूने सोनाली कुलकर्णी या तमाम लाखो रसिक
प्रेक्षकांच्या चाहत्या झाल्या आहेत.प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन
शिक्षणानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर सिनेसृष्टीत आपले पाय रोवले आहेत.
सामाजिक
जाणीव सतत जागृत ठेवून त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.दैनंदिन जीवनात
सुद्धा स्वतःला पटलेली वैचारिक भूमिका घेत त्या कायम उंचीवर वावरत राहिला.
त्यांच्याकडून त्यांच्या आई-बाबांच्या मोठ्या अपेक्षा होत्या.त्या त्यांनी खऱ्या
अर्थाने पूर्ण केले आहेत.त्यांच्या आवडत्या क्षेत्राला त्यांनी झोकून देत न्याय
दिला आहे.विविध नाटक,सिनेमा यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील त्यांनी केलेल्या
भूमिका नृत्याविष्कार अनेक कार्यक्रमांचे केलेले मूल्यमापन या दृष्टीने त्यांचा
प्रवास नाट्यसृष्टीसाठी अभिमानास्पद राहिला आहे.अगदी प्रारंभीच्या काळापासूनच
त्यांनी रंगमंचावर आणि सृष्टी सिनेसृष्टीत केलेला प्रवास त्यानंतर त्यांनी कधी मागे
वळून पाहिले नाही.अनेक सिनेमांमध्ये त्यांची भूमिका मराठी रसिकांच्या मनावर कायमच
अधिराज्य गाजवणारी ठरली आहे कसलेल्या अभिनयाच्या माध्यमातून समाजमनावर परिणाम करता
येतो हे त्यांच्या नाटक सिनेमातील भूमिकेतून अनेकदा सिद्ध झाले आहे त्यांनी
केलेल्या भूमिका आजही रसिकांच्या डोळ्यात अश्रू उभे करतात तर कधी चैतन्याच्या भाव
अधोरेखित करतात त्यांचे सद्यस्थितीतील रंगमंचावरील कार्य रसिकांच्या मनावर एक
सामाजिक बांधिलकीचे भाव कोरले जात आहेत त्यांची सिनेसृष्टीवर असलेले भक्ती प्रेम
मोठे आहे.जेव्हा कलेवर आपले प्रेम असते तेव्हा जिवंत अनुभव देता येतो हे सोनाली
कुलकर्णी यांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर लक्षात येते.त्यांनी आतापर्यंतच्या
कारकिर्दीत कित्येक मराठी हिंदी व इतर भाषेतील चित्रपटात भूमिका केल्या अनेक
नाटकांमधून त्यांनी वेगळेपण सिद्ध केले.कलाकार हा विचारवंत असू शकतो.या धारणेवर
सोनाली कुलकर्णी यांच्या विचारसरणीने शिक्कामोर्तब केले असे म्हटले तर वावगे ठरू
नये.त्या विज्ञानवादी आणि विवेकशील आहेतच त्यांच्या समाजाच्या उन्नतीची दृष्टी
सुद्धा आहे.सामाजिक काम करण्याच्या त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत
आहे यशाची उंची त्यांना कधीच माणसांपासून तोडू शकत नाही असा त्यांचा एकूणच स्वभाव
आहे विचारांवरती प्रेम करणाऱ्याची प्रसिद्ध मराठी स्नेह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
आज सोमवारी अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी येथे गणेश उत्सवाच्या मंचावर येत आहे.
पाथर्डीकर गणेश भक्तांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अदाकरीची पर्वणी!
----------------------------- तमाम पाथर्डीकर गणेश भक्तांसाठी मराठी सिने
सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या अदाकरीची पर्वणी लाभणार असून
पाथर्डी येथील ज्येष्ठ युवा कार्यकर्ते आणि जगदंबा प्रतिष्ठानचे ॲड.प्रतीकदादा
खेडकर यांच्या पुढाकारातून ही संधी प्राप्त होणार आहे.यापूर्वी जगदंबा
प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी अत्यंत पवित्र उत्साह पूर्ण वातावरणातील
गणेशोत्सवामध्ये विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होत आली आहे.यंदाही
जगदंबा प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव २०२३ मध्ये विविध धार्मिक,सामाजिक,
शैक्षणिक
कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.युवानेते ॲड.प्रतीकदादा खेडकर यांनी
त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आणि गणेशभक्तांच्या आणि भाविक भक्तांच्या
सहकार्याने यंदा गणेश भक्तांच्या ज्ञानार्जन आणि करमणुकीसाठी मराठी सिनेसृष्टीतील
आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना खास विशेष आमंत्रित केले आहे. तिचे या
गणेश मंडळाच्या मंचावर सोमवारी आगमन होणार आहे.गणेश भक्तांशी ती आपल्या कला
अदाकारीसह संवाद साधणार आहे.जगदंबा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने
पाथर्डी व तालुक्यामध्ये अत्यंत पवित्र अध्यात्मिक सुगंधी वातावरण तयार झाले असून
श्री गणेश येत्या काळात गणेश भक्तांच्या इच्छा पूर्ण करून शेतकरी ऊसतोड
कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सुख यश आनंद आणि भरभराट आणेल असा
विश्वास जगदंबा प्रतिष्ठानचे ॲड.प्रतीकदादा खेडकर यांनी व्यक्त केला आहे. पाथर्डी
शहराचा वैभव असणारा आणि विविध सामाजिक उपक्रमांतून सर्वांच्या पसंतीस उतरलेला जगदंब
प्रतिष्ठान गणेशोत्सव पाथर्डी २०२३ च्या अध्यक्ष निखिल चिंतामणी,उपाध्यक्ष अजय
विघ्ने,खजिनदार सौरभशेठ दानापुरे यांनी जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष
ॲड.प्रतिकदादा खेडकर यांंच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त यावर्षी दि.२५
सप्टेंबर रोजी मंडळाचे सर्व सदस्यांच्या अनुमतीने मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना निमंत्रित केले आहे.यानिमित्त आयोजित कार्यक्रमास
खा.डाॕ.सुजयदादा विखे,आ.मोनिकाताई राजळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार
आहेत.पाथर्डी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
मुख्यसंयोजक ॲड.प्रतिकदादा खेडकर यांनी केला आहे.अभिनेत्री सोनालीच्या येण्याची
प्रतीक्षा प्रचंड आहे.सोनाली कुलकर्णीच्या माध्यमातून पाथर्डीकर यांचा श्री गणेश
उत्सव अत्यंत धमाकेदार होईल यात शंका नाही.अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे पाथर्डी
शहरात आज होणाऱ्या आगमानाचे स्वागत..! ------------------------------
सोबत फोटो
0 टिप्पण्या