
आष्टी.
आष्टी तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांची सहकारी संस्था असलेली कडा येथील श्री साईनाथ वीज सेवकांची सहकारी पतसंस्थेने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले असल्यामुळे या पतसंस्थेची प्रगती होत आहे.यांच्या दैनंदिन गरजा आणि अडचणी भागवण्यासाठी संस्थेने केलेले काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले तर यावेळी प्रमुख अतिथी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य देविदासआबा धस म्हणाले की,वीज कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी साईनाथ वीज सेवकांची सहकारी पतसंस्था ही वीज कर्मचाऱ्यांच्या
त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी चांगले काम करत आहे असे सांगितले.कडा येथील श्री साईनाथ वीज सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ३७ व्या.वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.भीमराव धोंडे आणि देविदास धस बोलत होते.यावेळी बीड जि.प.चे माजी सदस्य उद्धवबापु दरेकर,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,
श्रीरंगआप्पा कर्डिले सहाय्यक अभियंता घोटेकर,नसहाय्यक अभियंता बनकर,डॉ.महेश नाथ,पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तमराव बोडखे,प्रविण पोकळे उपस्थित होते.या संस्थेचे चेअरमन विठ्ठल शेंबडे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की,दि.३१ मार्च २०२२ अखेर सभासद संख्या ८१ होती यावर्षी ९ सभासदांची वाढ होऊन कार्यक्षेत्राबाहेर बदलून गेल्याने व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सेवेतून सेवानिवृत्त झालेले आणि राजीनामा दिलेले ६ सभासद कमी झाले असून ३१ मार्च २०२३ अखेर ८४ सभासद आहेत गतवर्षी संस्थेचे भाग भांडवल ७९ लाख इतके असून त्यामध्ये ११ लाख ६२ हजार इतकी वाढ होऊन एकूण ९० लाख ७० हजार रुपये भाग भांडवल जमा झाले आहे संस्थेच्या सभासदांना घरबांधणी घर खरेदी धार्मिक कार्य आजारपण पाल्याचे शिक्षण तसेच विवाह व इतर अडचणीसाठी कर्ज वितरण करण्यात येते.कर्ज मिळवण्यास पात्र असणारा एकही सभासद कर्ज मिळण्यापासून वंचित राहिलेला नाही असे सांगितले.
वया श्री साईनाथ वीज सेवकांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांचे पाल्य असलेले चि.
हर्षवर्धन अमोल कर्डिले,कु.रेणुका कैलास बनसोडे,चि.सुमित दिगंबर सोनवणे,कु.तृप्ती रविकुमार कोकाटे,चि.प्रताप रमेश रसाळ, चि.वैभव रवी कुमार कोकाटे,कु.विभावरी प्रशांत पोकळे,चि.स्वप्निल राजेंद्र गांजुरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळाल्याबद्दल तसेच चंद्रकांत करडकर यांनी उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी सन्मान मिळवल्याबद्दल आणि कु.डॉ.प्रतीक्षा रमेश बनसोडे हिने मेडिकल क्षेत्रातील बीडीएस ही पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्यावतीने या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आणि संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शेंबडे,भाऊसाहेब निंबाळकर,अमृत वांढरे,उपाध्यक्ष रमेश बनसोडे,मानद सचिव शाकीर शेख, शिवा गोरे,प्रशांत पोकळे,अमृत आजबे,संचालक महेश घोडके,अमोल कर्डिले,अशोक काकडे, बापूराव क-हे,अश्विन मंडाले,श्रीमती निर्मला गळगटे,श्रीमती उषा जगदाळे आणि सचिव मारुती कर्डिले यांचेसह अनेक सभासद उपस्थित होते.
0 टिप्पण्या