आष्टी येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सोपानराव
जोगदंड आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रतिभा सोपानराव जोगदंड यांची कन्या श्रीदेवी
सोपानराव जोगदंड हीस केंब्रीज विद्यापीठातुन हाॕननरी पीएच.डी.पदवी नुकतीच गोवा येथे
माजी मुख्यमंत्री दिगांबर कामत, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप भारव्दाज,व्हाईस
चेअरमन वरुण यादव यांंच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरु
आर.सी.कुहाड,कुलगुरु सेवाशन मेरडेस ,भारतीय सैन्य दलाचे ब्रिगेडीयर राजीव चव्हाण
यांंच्या हस्ते प्रदान करण्यात आली.श्रीदेवी जोगदंड हीच्या यशाबाद्दल आ. बाळासाहेब
आजबे ,आ. सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे ,माजी आ.साहेबराव दरेकर, विजय गोल्हार
,दिपक टेकाडे,पत्रकार उत्तम बोडखे,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,सुलेमान पठाण,आण्णासाहेब
साबळे ,श्रीरंग सातपुते, सौ.रत्नमाला चाळक आदिसामाजिक , राजकीय ,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या