Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी शहरातील किंग आॕफ द प्रेस लाईन दत्ताभाऊ बोडखे

विशेष लेख ---------- प्रा.बिभिषण चाटे. -------------- म.फुले,शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समता,बंधुत्व आणि ऐक्याच्या जोरावर मानवतावादाचा उत्स्फूर्त जयजयकार प्रारंभीपासूनच करण्यात आला आहे.शिक्षणाच्या माध्यमातून फुले दांपत्यानी स्त्री पुरुष समानतेचा दिव्य संदेश दिला.त्यांच्या विचार कार्याला स्मरुण समतावादी सैनिकांच्या माध्यमातून तेजस्वी विचारधारा निर्माण करण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे समतावादी तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेले आष्टीचे युवा उद्योजक तथा युवा नेतृत्व दत्ताभाऊ बोडखे! शांत,संयमी,व्यासंगी, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन विचारधारा पुढे नेण्यासाठी तितक्याच दमदारपणे पाऊल टाकणारं एक युवकांच्या गराड्यातील लोकप्रिय नाव! महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये उच्चस्थानी नेते ठरलेल्या छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिकांची तालुकाभर संघटन करून उत्तम कौशल्य दाखवणाऱ्या दत्ताभाऊ बोडखे यांची सर्वच पक्ष आणि संघटनांमध्ये लोकप्रियता आहे.मानवी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या संत सज्जन आणि महापुरुषांच्या विचार कार्याला स्मरण त्यांची जयंती,पुण्यतिथी, करण्यामध्ये दत्ताभाऊ बोडखे याचा सदैव पुढाकार राहिलेला आहे.जाती धर्म पंथ यांना समतेच्या ऐक्यात गुंफून मानवी जीवन आनंदी करण्यामध्ये दत्ताभाऊंची सतत धडपड असते. युवकांनी विशेषत: शिकले पाहिजे,उद्योग व्यवसायामध्ये स्वतः पुढाकार घेऊन रमले पाहिजे.ही त्यांची धारणा आहे.आणि म्हणूनच त्यांनी बोडखे प्रेसच्या माध्यमातून आधी केले नंतर सांगितले या युक्तीनुसार प्रेरणास्थान निर्माण केले आहे. पाच वर्षापुर्वी आष्टी शहरात बोडखे प्रेसची सुरुवात केली.आ. आजबे,आ.धस,माजी आ.धोंडे,माजी आ.दरेकर यांंच्या प्रमुख उपस्थितीत बोडखे प्रेस सुरु झाली.अल्पावधीत या प्रेसने नावलौकिक मिळविला आहे. गुणवत्ता,व्हरायटी,दर्जा,योग्यभाव,तत्परसेवा आदीसह ग्राहकांच्या सेवेत आधुनिक स्वरूपात सहज उपलब्ध असलेले छपाई प्रिटींगसह, शालेय आणि महाविद्यालयीन छपाई,बँका,पतसंस्था आणि निवडणुकीचे पोस्टर्स,स्टिकर्स आदी विविध क्षेत्रांसाठी निर्माण झाले आहे.बीड- अहमदनगरसह विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी जाण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने व्यवसायिकांना वेळ,खर्च लागत असे ही उणीव सातत्याने लक्षात घेऊन दत्ताभाऊ बोडखे यांनी पाच वर्षापूर्वी आष्टी शहरांमध्ये आधुनिक सेवा उपलब्ध करून दिली आहे.विविध प्रकारच्या छपाई प्रिटींगसह शालेय आणि महाविद्यालयीन स्टेशनरी छपाई विविध प्रकारच्या राष्ट्रीय आणि खाजगी बँका तसेच पतसंस्थांसाठी स्टेशनरी प्रिटिंग उपलब्ध झाली आहे.विविध प्रकारच्या निवडणुकांचे पोस्टर्स, पोम्प्लेट,स्टिकर्स त्याचबरोबर आधुनिक फ्लेक्स प्रिंटिंग यामध्ये बॅनर आणि बोर्ड यांचा समावेश आहे. आष्टी शहर आणि तालुक्यातील अनेक हॉस्पिटल्सच्या फाइल्स,रिपोर्ट्स आणि लॅब रिपोर्ट,स्टेशनरी प्लॅस्टिक प्रिंटिंग यामध्ये बोडखे पॕटर्न अल्पावधीत धबधबा निर्माण करू शकला आहे.सामाजिक बांधिलकीचा अंतर्भाव असलेल्या बोडखे प्रिंटिंगमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, पोम्प्लेट,पोस्टर छपाई त्याचबरोबर भेट वस्तू आणि फोटो फ्रेम अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि अल्पावधीत देण्याचे भाग्य बोडखे प्रेसला मिळाले आहे. आधुनिक प्रकारच्या सफाई प्रिंटिंगसह डिजिटल ऑफसेटला ग्राहकांची मोठी पसंती आहे.उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या बोडखे पॅटर्नमुळे सर्वसामान्य ग्राहक आदीसह शेतकरी आणि लघु,कुटिर उद्योगांच्या मालकांना या प्रेसमुळे वेळ,पैसा आदीसह शारीरिक कष्ट वाचू शकले आहे.बीड जिल्ह्यातील नामवंत पत्रकार उत्तम बोडखे यांचे ते चिरंजीव आहेत. आई आदर्श शिक्षिका, मोठा भाऊ इंजिनिअर असल्याने तसेच भगिनी डॉक्टर असल्याने कौटुंबिक वातावरण उच्चशिक्षित झाल्यामुळे त्यांच्या विचाराची जडणघडण ही तितकीच दर्जेदार आहे.युवकांचे संघटन करून योग्य दिशेने समाजाला नेण्यासाठी प्रयत्नात असलेल्या समता सैनिकांच्या गळ्यातील ताईत अर्थातच युवा उद्योजक दत्ताभाऊ बोडखे यांना शुभेच्छा... प्रा.बिभिषण चाटे. --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या