आष्टी
जामखेड शहरात एका खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सने आष्टीतील एका लग्नाळू
तरुणाला एक एकर जमिनीसह साडेनऊ लाख रुपयांना गंडा घातला आहे.पहिले दोन विवाह
असताना तिसरा केला.त्यानंतरही चौथ्यासोबत प्रेमसंबंध केल्यानंतर तरुणाने पोलिस ठाणे
गाठून फिर्याद दिली.त्यावरून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.आष्टी तालुक्यातील
केळसांगवी येथील बिभीषण पडोळे याचे आष्टी शहरात मेडिकल आहे.त्याचा दिनेश (नाव
बदलले) नातेवाईक अविवाहित आहे.जामखेड शहरात एका खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून काम
करणारी मुलगी आहे.कामधंदा करतेय तिच्याशी तुझे लग्न लावून देऊ असे म्हणत दिनेशला
मांडवा येथील भगवान धुमाळ,ईश्वर मुटकुळे यांनी गळ घातली पण त्याअगोदर मुलीच्या
म्हणण्यानुसार शेती नावावर करून पाच लाख रूपये व दागिने द्यावे लागतील अशी बोलणी
झाली. ३१ जानेवारी २०२३ असा लग्नाचा मुहूर्तही ठरला.त्याअगोदर २७ जानेवारीला
दिनेशने एक एकर शेती बिभीषण याच्या नावे केली.तसेच शारदा आरसूळ (नर्स)हिच्या बँक
खात्यात ५ लाख रूपये आरटीजीएस केले.त्यानंतरच ठरल्याप्रमाणे कपिलधार येथे लग्न
झाले.लग्नानंतर काही दिवसांनी दिनेश कामानिमित्त बाहेर जात असे.त्यानंतर बिभीषण
घरी यायचा.शारदा आणि बिभीषण यांना दिनेशने एका खोलीत रंगेहाथ पकडले.त्यामुळे
त्यांच्या प्रेमप्रकरणाच भांडाफोड झाला पण जमीन, पैसे परत देतो म्हणाल्याने दिनेश
शांत राहिला त्यानंतर काहीच प्रतिसाद मिळाल्याने दिनेशने काल सोमवारी आष्टी पोलिस
स्टेशनमध्ये फिर्याद दिली.या फिर्यादीवरुन शारदा आरसूळ (रा.नाशिक),बिभीषणपडोळे
(रा.केळसांगवी),भगवान धुमाळ,ईश्वर मुटकुळे (दोघे रा.मांडवा) यांच्यावर फसवणुकीचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या