Ticker

6/recent/ticker-posts

लोणी ते कोयाळ या रस्त्यावरील रेल्वे मार्गावर पूलाचे बांधकाम करावे - माजी आ.साहेबराव दरेकर

आष्टी अहमदनगर ते बीड या रेल्वे मार्गावर लोणीसय्यदमीर ते कोयाळ या रस्त्यावर रेल्वे विभागाने पूल बांधकाम करणे आवश्यक होते परंतु या ठिकाणी पूल नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत लोणी ते कोयाळ हा रस्ता रेल्वे मार्गामुळे बंद झालेला आहे. वास्तविक पाहता लोणी ते कोयाळ हे अंतर केवळ ५ कि.मी.
आहे परंतु या ठिकाणी रेल्वे मार्गावर पुलाचे बांधकाम नसल्यामुळे लोणी सय्यद येथून नागरिकांना कोयाळ येथे जाण्यासाठी पिंपळा या गावा मार्गे १२ कि.मी.अंतरावरून जावे लागत आहे.या रेल्वे मार्गावर रेल्वे क्रॉसिंगची सूचना मिळत नसल्यामुळे अपघात झाले आहेत यामध्ये एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहे.त्यामुळे लोणी ते कोयाळ या रस्त्यावरील रेल्वे मार्गावर पुलाचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी मागणी केलेली आहे. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांनी संबंधित रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाच्या बांधकामाबाबत आदेश द्यावेत अशी मागणी माजी आ.साहेबराव दरेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या