आष्टी
आ.बाळासाहेब आजबे मित्र मंडळ आयोजित शिवशंभो गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे चौक आष्टी यांच्यावतीने यावर्षी आष्टीकरांसाठी या मंडळाच्यावतीने सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाचा आष्टी आणि तालुक्यातील सर्व भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवशंभो गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे .
आष्टी येथे यावर्षी प्रथमच शिवशंभो गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे चौक आष्टी यांच्यावतीने आ.बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता भव्य भजन स्पर्धा झाल्या., गुरुवार दि.२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता टीव्ही फेम युवा संगीत सम्राट शाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोक गाणी पोवाडा कार्यक्रम,शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता धनगरी गजे वाद्य परंपरेचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजे ढोल पथकांचा भव्य कार्यक्रम,शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देशातील प्रसिद्ध मुंबई व कोल्हापूर येथील कवाली सम्राटांचा भव्य मुकाबला होणार आहे.रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सारेगम विजेती महाराष्ट्राची गानकोकिळा कु. अंजली व नंदिनी गायकवाड यांचा मराठी, हिंदी गीतांचा चांदणे सुरांचे हा सदाबहार कार्यक्रम होणार आहे.हे सर्व कार्यक्रमाचे ठिकाण अण्णाभाऊ साठे चौक आंबेडकर उद्यान आष्टी येथे होणार आहेत.आष्टी तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी आणि जनतेने या सर्व कार्यक्रमांचा उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शिवशंभो गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या