

महाराष्ट्र शासनाच्या
ग्रामविकास विभागाअंतर्गत २५ /१५ मधून आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघातील
११२ गावातील सभा मंडप कामासाठी १० कोटी रुपयांचा विकास कामास प्रशासकीय मान्यता
मिळाली असून लवकरच ही कामे सुरू करून ११२ गावांमध्ये सभामंडप उभारण्यात येणार
असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महाराष्ट्र
शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे आपण विविध गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार
पत्रा सभामंडप कामाची यादी नुसार मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून राज्याचे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश
महाजन यांनी मंजुरी देत मतदार संघातील ११२ गावांमध्ये १० कोटी रुपये किमतीच्या सभा
मंडपाच्या कामास मंजुरी दिली आहे.त्याबद्दल आपण आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार
संघातील जनतेच्यावतीने राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो.आष्टी पाटोदा शिरूर
तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पर्यंत सभामंडप नव्हते गावातील ग्रामस्थांच्या
मागणीनुसार इतर काम करणे पेक्षा सभामंडप महत्वाचा असल्याने गावामध्ये एक मोठा
निवारा त्यामुळे तयार होतो त्यानुसार आपण ग्रामविकास विभागाकडे सभामंडपाच्या
कामासाठी मागणी केली होती अखेर आज उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार, कृषिमंत्री ना.धनंजय
मुंडे यांच्या माध्यमातून व ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार
या १० कोटी रुपयांच्या सभामंडपाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे त्यामुळे
मतदारसंघातील ११२ गावांमध्ये लवकरच सभामंडपाचे काम सुरू होऊन चांगल्या प्रकारे काम
होणार आहे , सामाजिक न्याय विभागाअंतर्गत पाच कोटी रुपये किमतीच्या दलित वस्ती
कामांनाही मंजुरी मिळाली आहे मतदारसंघातील या विविध विकास कामांना मंजुरी मिळवून
दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे,ग्रामविकास मंत्री गिरीश
महाजन या सर्वांचे आपण मतदार संघातील जनतेच्यावतीने आभार व्यक्त करतो.यापुढेही आपण
मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी सरकारकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून
घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या