

आष्टी...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत.याला पाठिंबा देण्यासाठी आष्टी शहरात गुरुवार दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासूनच जवळपास तीनतास तर तालुक्यात सात ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले.आष्टी तालुका मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने करण्यात आले यामध्ये सखल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.आष्टी तालुक्यात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने आष्टी शहर,कडा, धामणगाव ,डोईठाण, धानोरा, खडकत, चिंचपूर अशा ठीक ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीने "आता नाही तर पुन्हा कधीच नाही" "जय भवानी जय शिवाजी" "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणाबाजी करत आष्टी तालुक्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलने करण्यात आली.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.आष्टी तालुक्यातील कडा,आष्टी,
धानोरा,धामणगाव,खडकत,चिंचपूर,
डोईठाण या गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी सुधीर पठाडे,राहुल जगताप,सायली हंबर्डे,राजेंद्र दाहातोंडे,शशीकांत कन्हेरे,डॉ.
जालिंदर वांढरे,कवी संजय शेळके,
अहेमद पठाण,डॉ.नदीम शेख,
डॉ.मधुकर हंबर्डे,आण्णासाहेब चौधरी,तानाजी जंजिरे,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,दत्ताभाऊ काकडे,देवीदासआबा धस यांची भाषणे झाली. यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,देविदासआबा धस,जयदत्त धस,अभयराजे धोंडे,तानाजीबापु जंजीरे,आण्णासाहेब चौधरी,रामभाऊ खाडे,सोपान निंबोरे,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्याक्ष दत्ताभाऊ काकडे,डॉ.मधुकर हंबर्डे, सुधीर पठाडे,
सुनिल रेडकर,अमर निंबाळकर,जालिंदर श्रीखंडे,बन्शीभाऊ मोरे,रघुनाथ आवारे,
जालिंदर पोकळे,डॉ.जालिंदर वांढरे,
अहेमद पठाणडॉ.नदीम शेख,सायली हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा नगरसेवक सुनील रेडेकर यांनी उपस्थित मराठा आणि मराठेत्तर समाजाचे आभार मानले.
0 टिप्पण्या