आष्टी
जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भविष्यात पशुधनासाठी
चाऱ्याच्या उपलब्धतेची परिस्थिती गंभीर होणार आहे.संभाव्य चारा व टंचाईची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने बीड
जिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास मनाई केली आहे अशी माहिती तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार ३१ ऑगस्टपर्यंत १ लाख
८६ हजार ४५९ मेट्रीक टन चारा शिल्लक
होता.तो अंदाजे ४३ दिवस पुरेल. त्यामुळे
चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी
यांनी दिलेल्या आदेशानुसार मनाई
करण्यात आली आहे.
जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होऊ नये,या करिता उत्पादित
होणारा किंवा सद्य:स्थितीत असणार
सर्व प्रकारचा वाळलेला, ओला चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास पुढील
आदेशापर्यंत उपजिल्हाधिकारी यांच्या
आदेशाने मनाई घालण्यात आली
असल्याचेही प्रमोद गायकवाड म्हणाले.
0 टिप्पण्या