Ticker

6/recent/ticker-posts

मच्छिंद्रनाथ मल्टिस्टेट बॕँकेच्या चेअरमनपदी राऊत तर व्हाईस चेअरमनपदी शिंदे यांची फेरनिवड

आष्टी आष्टी येथील मच्छिंद्रनाथ मल्टिस्टेट पतसंस्थेच्या संचालक मंडळाची विशेष बैठक गुरुवारी दि.१४ सप्टेंबर रोजी पार पडली.आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत या मल्टीस्टेटच्या चेअरमनपदी नामदेव राऊत तर व्हाईस चेअरमनपदी गणेश शिंदे यांंची फेरनिवड करण्यात आली आहे.संस्थेच्या सन २०२३- २०२४ ते २०२७-२०२८ याकालावधीसाठी संचालक,पदाधिकारी निवड प्रक्रिया अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मछिंद्रनाथ मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.आष्टी तथा सहाय्यक निबंधक बाळासाहेब शिंदे यांचे नियंत्रणाखाली सहाय्यक निबंधक कार्यालययाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली होती.पदाधिकारी निवड सभा नोटीस विषय पत्रिकेनुसार चेअरमनपदी नामदेव रघुनाथ राऊत आणि व्हाईस चेअरमनपदी गणेश नवनाथ शिंदे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे अविरोध निवड झाल्याचे निवडनुक निर्णय अधिकारी,सभाध्यक्ष यांनी घोषित केले.या सभेत उपस्थित नवनिर्वाचित संचालक मिर्झा झिया बेग,किशोर झरेकर,सुधीर घोडके,अनिल जगदाळे,शिवाजी पवार ,अनिल काथवटे,हाफिज तांबोळी,सौ.प्रतिभा थोरवे,सौ.अश्विनी जरांगे आणि संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी इमरान फत्ताउदद्दीन खतीब यांचे उपस्थितीत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ ते २०२८ झाल्याची अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण शिंदे यांनी जाहीर केले.यावेळी उपस्थित संचालकांनी नवनिर्वाचीत चेअरमन,व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले आणि सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या