Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे गटविकास अधिकारीपदाचा राजेंद्र गर्जे यांनी पदभार स्वीकारला

आष्टी आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांची पदोन्नती होऊन उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड जल जीवन मिशन या पदी पदस्थापना करण्यात आल्यामुळे आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद रिक्त होते.त्याचबरोबर सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद देखील रिक्त होते. त्या जागेवर पंचायत समिती पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथून बीड जिल्हा परिषद येथे बदली झालेले सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांची आष्टी पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर बदली झाली आहे.त्यांच्याकडे आष्टी पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.राजेंद्र गर्जे यांनी यापूर्वी बीड जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत चांगले काम केले असल्यामुळे त्यांना आष्टी तालुक्याचा चांगला परिचय आहे.त्यामुळे त्यांनी आष्टी गटविकास अधिकारी या पदावर अत्यंत कार्यक्षमपणे काम करू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.दि.१७ सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती दिन सोहळ्यानिमित्ताने आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये ध्वजारोहण यांच्या हस्ते करण्यात आले.आष्टी पंचायत समितीमधील सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.आष्टी तालुक्यातील जनतेकडून त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांचे स्वागत जेष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे,वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,भाजप नेते शंकर देशमुख सभापती बद्रीनाथ जगताप,पुर्व शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे ,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,अविशांत कुमकर,डाॕ.मंगेश ढेरे,राजेंद्र लाड,दादा जगताप,महाजन,बाळासाहेब जगताप,राजकीय ,सामाजिक आणि पंचायत समिती अधिकारी,कर्मचारी आदिंनी केले. ---------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या