Ticker

6/recent/ticker-posts

खा.प्रीतमताई मुंडे आणि माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मध्यस्थीने भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के यांचे उपोषण मागे ------------ दोन दिवसांत पिकांचा फेर सर्वे करून पीक विमा अग्रीम मिळेल असे तहसीलदारांनी दिले आश्वासन...

उत्तम बोडखे,आष्टी. आष्टी तालुक्यातील दौलावडगांव महसूल मंडळाला २५ टक्के अग्रीम पिक विमा मिळणाऱ्या यादीतून वगळले आहे.दौलावडगांव महसूल मंडळामध्ये फक्त पेरणीचेवेळी अल्पसा पाऊस झाला त्यानंतर पाऊस झाला नाही तरी चुकीचे अहवाल सादर करण्यात आल्याने या परिसरातील शेतकरी पीक विम्यापासुन वंचित राहू नयेत यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज आष्टीचे तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण झाले.या उपोषणकर्ते यांना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भेट दिली.यावेळी धोंडे आणि म्हस्के यांनी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला.त्यामध्ये कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण,खा. डॉ.प्रीतमताई मुंडे,जिल्हाधिकारी मुधोळ -मुंडे यांच्याशी धोंडे आणि म्हस्के यांनी चर्चा करून उपोषण मागे घेतले.ना. धनंजय मुंडे यांनी आपण सोमवारी होणा-या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले तर दोन दिवसांत दौलावडगाव भागातील पिकांचा फेर सर्वे करून पीक विमा अग्रीम मिळेल असे तहसीलदार गायकवाड यांनी लेखी आश्वासन दिले. आष्टी येथे ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आष्टी तहसील समोर उपोषण सुरू करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले की,प्रशासन व सरकार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.प्रशासन चुकले तर कार्यकर्त्यांना दुरुस्तीसाठी आंदोलन, उपोषण करावे लागते.त्याममुळे आजचे हे भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण झाले आहे.वरिष्ठांनी हा प्रश्न मार्गी लागणार आहे असे ठोस आश्वासन दिले आहे म्हणून आपण हे उपोषण मागे घेण्यात यावे असेही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. यावेळी साहेबराव म्हस्के म्हणाले की, दौलावडगांव महसूल मंडळाला २५ टक्के अग्रीम पिक विमा यादीतून वगळले आहे. याभागाच्या शेतक-यांनी उडीद,सोयाबीन, तुर मुग, बाजरी आदि पिकांचा विमा भरलेला आहे.असे असतांना बीड जिल्ह्याची २५ टक्के अग्रीम पिक विमा मिळणेची यादी महसूल खात्याने जाहीर केली, त्यामध्ये आष्टी तालुक्यातील दौलावडगांव महसूल मंडळ वगळले आहे. त्यामुळे शेतक-यामध्ये शासनाचे या निर्णयामुळे असंतोष निर्माण झाला आहे. दौलावडगांव महसूल मंडळाचा २५ टक्के अग्रीम पिक विमा यादीत समावेश करावा अशी आग्रही मागणी केली. यावेळी युवराज वायभासे,अर्जुन औटे, विष्णूपंत वायभासे,अशोक म्हस्के,रघुनाथ शिंदे,राधाकिसन सिरसाट,प्रा.दादासाहेब झांजे, शंकर देशमुख,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,भाजप नेते वाल्मिकतात्या निकाळजे,माजी आ.भीमराव धोंडे यांनी भाषण केले. यावेळी जि.प.सदस्य सुरेश माळी, सावरगावचे सरपंच सौ.शशिकला पंढरीनाथ चंदनशिव ,अर्जुन म्हस्के, अमोल म्हस्के,भदरी म्हस्के,माजी सरपंच गंगाधर शिरसाट पाटिल,ज्ञानदेव म्हस्के, हरिभाऊ तांदळे, सदाशिव दिंडे,भगवान धुमाळ,आण्णा लांबडे, सरपंच भरत जाधव, दिनकर वाघमारे, ग्यानबा साळवे,नगरसेवक बेग,अज्जुभाई शेख,दादा जगताप ,छगन तरटे,महादेव वायभासे, उध्दव सिरसाट,सचिन घुले,सोले पाटील,उत्तम बोडखे,संदीप नागरगोजे,प्राचार्य कैलास वायभासे,बाबु कदम,राधाकिसन सिरसाट,तुकाराम औटे,मच्छिंद्र घाटविसावे,रामदास दळवी, नंदु फसले ,जालिंदर औटे,सरपंच सचिन दळवी,रघुनाथ शिंदे,सरपंच हरि दळवी, संजय चंदनशिव,सरपंच संजय विधाते,संदीप रोकडे,प्रकाश कोकणे, गहिनीनाथ जगताप,भरत तवले,किसन आमटे, विष्णु दहिफळे,अभय गर्जे,एन. टी.गर्जे आदि उपस्थित होते. यावेळी दौलावडगाव,सालेवडगाव ,केळ, पिंपळगांव घाट,देऊळगांव घाट, मराठवाडी,हारेवाडी,शेडाळा,अरणविहरा, सावरगाव,वेलतुरी,गंगादेवी,गहुखेल, पिंपरी घाटा,देवळाली,शेंडगेवाडी, कारखेल,म्हसोबाचीवाडी,खरकटवाडी, तागडखेल,धामणगांव,नांदुर,गंगादेवी, बांदखेल,वाघळुज,लमाणतांडा,चिंचेवाडी,आंबेवाडी,मंगरूळ,टाकळसिंग, पारगांव,पोखरी,पाटसरा,डोईठाण, देविनिमगाव या ३५ गावातील कार्यकर्ते,शेतकरी उपोषणात सहभागी झाले होते.उपस्थितांचे भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या