Ticker

6/recent/ticker-posts

नागनाथ विद्यालयात शिक्षक दिन , माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे नागतळा येथील नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागतळा या शाळेत ५ सप्टेंबर शिक्षक दिन,माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा दि.५ सप्टेंबर मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.नागनाथ विद्यालयाची स्थापना १९८७ साली झाली.या ठिकाणी २००१ पासून अकरावी कला व बारावी कला वर्ग सुरू करण्यात आले.१९८७ ते २०२३ दरम्यान शिक्षण घेतलेले असंख्य माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नागतळा येथे नागनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.या यात्रेनिमित्त हे सर्व विद्यार्थी आपल्या गावी आले होते.यावेळी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे व यात्रेचे औचित्य साधून नागनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.प्रथमतः या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची ढोल -ताशा, शाळेच्या लेझीम पथकासह वाजत गाजत शाळेच्या प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत मिरवणुकीसह स्वागत करण्यात आले.या मेळाव्यानिमित्त एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी शाळेतील जुन्या आठवणीत हरवून गेले होते.प्रत्येक जण शाळेमध्ये राबविल्या जात असणाऱ्या वेगवेगळे उपक्रम - एक मूल एक झाड,कम्प्युटर लॅब, ग्रुप स्टडी,बहिस्थ व्यायाम शाळा व इतर उपक्रमांचे कौतुक करत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य के.बी.खाडे तर प्रमुख पाहुणे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी तथा शाळेचे माजी प्राचार्य डॉ.डी.बी.राऊत होते व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.सुनील सोनवणे,नितीन सानप,रामदास सोनवणे,शिवाजीराजे गर्जे सरपंच नागतळा,मच्छिंद्र वायभासे उपसरपंच,बाबासाहेब गर्जे माजी सरपंच,बाळासाहेब वनवे माजी उपसरपंच , बापूसाहेब चौधार,अभिमान गर्जे उपस्थित होते.यावेळी उच्च पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी विकास गोरे,देवदत्त कद्रे,डॉ.सुनील सोनवणे,बाबासाहेब भगवान गर्जे ,परमेश्वर रुस्तुम गर्जे,परमेश्वर गर्जे,बाळासाहेब आघाव,गोपीनाथ गोरे,ओंकार वनवे ,करण सोनवणे,गणेश सांगळे,तुळशीराम सोनवणे ,सचिन सानप, ईश्वर गर्जे ,उद्धव वनवे ,सुदर्शन सोनवणे, नवनाथ गर्जे,संभाजी सोनवणे, संकेत सोनवणे,माऊली गर्जे,गणेश सोनवणे ,संदीप भैय्या सोनवणे,संपत गोरे,महेश कद्रे,वसंत सोनवणे,संतोष गोरे,जयदत्त कद्रे,कृष्णा कद्रे,भरत सोनवणे,बप्पासाहेब वनवे,संदीप महाराज उनवणे,संदीप गर्जे व कु. निकिता कद्रे या कार्यक्रमाला उपस्थित होते.सर्वांचा फेटे बांधून शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी माजी विद्यार्थी संभाजी सोनवणे,बाबासाहेब गर्जे,संपत गोरे,देवदत्त कद्रे,ओंकार वनवे,करण सोनवणे,डॉ.सुनील सोनवणे,संदीपभैय्या सोनवणे यांनी आपल्या शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.शाळेच्या विद्यार्थ्यांनी,आपल्या प्रमाणेच व्यवस्थित अभ्यास करून व आई-वडिलांचे विचार व प्रेरणा नजरेसमोर ठेवून,शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडवावे असे मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नागनाथ विद्यालयाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी संस्थेच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.या वेळी अतिशय दुर्गम व डोंगराळ परिसरामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या नागनाथ विद्यालयातून अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत हे ऐकून व पाहून मी अतिशय समाधानी झालो असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य के.बी.खाडे यांनी शाळेच्या माध्यमातून मुलांना योग्य शिक्षण व संस्कार देऊन आदर्श विद्यार्थी घडविण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.बी.तळेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश औटे यांनी केले तर आभार प्राचार्य के.बी.खाडे यांनी मांडले.यावेळी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये ५ सप्टेंबर या दिवशी आपण आयोजित करू असे खाडे सर यांनी सांगितले.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले.शाळेला आर्थिक देणगी दिली.या कार्यक्रमाला शाळेचे सहशिक्षक राम बनसोडे,ए.जी.भोराडे, बी.वाय.शिंदे,एस.पी.गदादे.आर.बी .तळेकर,डी.टी.शिंदे,एस.एल घुमरे ,एस.आर.राऊत व्ही.एच.पवार,पि.के.गर्जे,नालकोल ए.डी.,शेखर पवार,ए.बी .सोनवणे,आव्हाड के.बी.यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या