
आष्टी शहरातील श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थान संचलित अनिषा ग्लोबल स्कूलमध्ये आज
शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम सुरू असतांनाच ह्रदयविकाराचा
झटका आल्याने शिक्षीकेचा मृत्यू झाला.शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने शहरात
मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी
असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सौ. सुनिता राजेंद्र गायकवाड (वय ४८) यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या आष्टी शहरातील श्री पिंपळेश्वर महादेव
देवस्थान संचलित अनिषा ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.मंगळवार
दि.५ सप्टेंबर रोजी शाळेत आयोजित शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२
वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला . त्या खुर्चीवर बसत असताना खाली
कोसळल्या.त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले .
त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित
केले. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.त्यांच्यावर दि.५ सप्टेंबर रोजी
सायंकाळी ७ वाजता जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी करण्यात आला.यावेळी
अंत्यसंस्कारास स्कुलच्या संचालिका सौ.प्राजक्ताताई सुरेश धस यांच्यासह शैक्षणिक
क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.सौ.सुनिता राजेंद्र गायकवाड यांच्या दुर्दैवी
मृत्युने आष्टी व जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पाठीमागे पती
राजेंद्र गायकवाड व दोन मुली,जावाई,नातवंडे असा परिवार आहे.
0 टिप्पण्या