Ticker

6/recent/ticker-posts

प्रामाणिक राजकारणी अन् निष्ठावंत पत्रकार!

आष्टी. संयम,शांतता,बंधुत्व..एकमेकांना मनापासून सदिच्छा देण्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी मानून काम करण्याची सदैव चिकाटी,जिद्द आणि आत्मविश्वास या बळावर कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते असे म्हणतात अशा शाश्वत लोकप्रियतेसाठी निष्ठा आणि प्रमाणिकपणा आवश्यक असतो आणि हेच तत्व आणि मुद्दे मानून राजकारणात अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करणारे आणि पत्रकारितेमध्ये तब्बल एकाच दैनिकात ३५ वर्षाहून अधिक काळ अत्यंत निष्ठेने घाम गाळून काम करणारे पत्रकार अशी ख्याती असणारे दुर्मिळ आहेत. परंतु आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी भीमराव धोंडे याला अपवाद आहे तर पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारितेची मान उंचावून पत्रकारितेला सन्मान मिळवून देणारे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचे कर्तुत्व खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आहे.एक आठवड्यापासून अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचे स्तवन पूजन महाआरती आणि नतमस्तक होऊन सर्वांनी आशीर्वाद घेतले अशा या अत्यंत पवित्र गणपती उत्सवात आष्टी तालुक्यातील विविध मंडळांची अत्यंत सुंदर रचण्याचे लेखणीतून सादर करण्याचे काम पत्रकार उत्तम बोडखे यांनी केले तर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अनेक ठिकाणी आवर्जून उपस्थित रहात गणेश भक्तांना उत्साह पूर्ण वातावरणात स्वतः ढोल वाजवत त्यांच्या आनंदोत्सवात सामील होऊन आनंद द्विगुणित करण्यात स्वतःला धन्यता मानली.या दोघांच्याही या प्रमाणिक निस्वार्थ कार्याला मतदार संघातील सर्व सामान्य जनतेने आशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या