
उत्तम बोडखे,आष्टी,
युवा मित्र संस्थेमार्फत
राज्यस्तरीय जलयोद्धा व्दितीय पुरस्कार आष्टी तालुक्यातील प्रा.डॉ.रामकृष्ण बोडखे
यांना सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ५० हजार रुपये मिळणार आहे.आज शनिवार
दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिन्नर घोटी महामार्गावरील लोणारवाडी येथील
संस्थेच्या आवारात या पुरस्काराचे वितरण संस्थेचे कार्यकारी संचालिका मनीषा पोटे
करणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा,शेती आणि पाणी विशेषतज्ञ
विजय बोराडे,ज्येष्ठ पत्रकार संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे.युवा
मित्रने २०२३ साठी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे 'सुनील स्मृती जलयोद्धा पुरस्कार'व
'सुनील स्मृती जीवनगौरव पुरस्कार'राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत.आज शनिवार
दि.१६ सप्टेंबर रोजी लोणारवाडी येथे संस्थेच्या कार्यालयात पुरस्कार वितरण सोहळा
होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी दिली.जिल्हाधिकारी जलज
शर्मा,शेती व पाणी विशेषज्ञ विजय बोराडे, संपादक संजय आवटे यांच्या उपस्थितीत सकाळी
११ वाजता वितरण सोहळा होणार आहे. संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांच्या स्मरणार्थ
युवा मित्र संस्थेच्यावतीने ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान 'जलसाक्षरता सप्ताह आयोजित
करण्यात आला होता. याअंतर्गत सिन्नर तालुक्यातील चास,सोनेवाडी,हरसुले,खंबाळे व
खडांगळी गावातील आदिवासी,मागासवर्गीय लोकांच्या वस्तीवर संस्थेच्यावतीने
पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात येणार आहे.यामध्ये वस्तीच्या गरजेनुसार
पाण्याची टाकी,पाइपलाइन,बोअरवेल किंवा हातपंप बसविणे अशी व्यवस्था करण्यात येणार
आहे.बलकवडी (जि.सांगली) येथील उगम फाऊंडेशनचे संपत पवार यांना प्रथम क्रमांकचा
पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे
स्वरूप आहे.त्यांनी जल व मृदा संधारणात ३५ वर्षांहून अधिक योगदान दिले आहे.द्वितीय
पुरस्कार आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील जलसेवक प्रा.डाॕ.रामकृष्ण गहिनीनाथ
बोडखे यांना प्रदान केला जात आहे. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ५० हजार
रुपये असे स्वरूप आहे.हा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,
माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते
,प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे,सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई,सेवानिवृत्त
शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे,इंजि.
पी.बी.बोडखे,प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे,माऊली बोडखे,चेअरमन बबन नन्नवरे,माजी चेअरमन
राजाराम नन्नवरे,सरपंच भीमराव बोडखे,चेअरमन शेख युनुस,भानुदास बोडखे आदींनी
अभिनंदन केले.
--------------------
२० वर्षापासून पाण्यावरील आणि
समाजसेवेचे काम केल्यामुळे आजपर्यंत १० पुरस्कार तसेच ६५ लक्ष रुपयाचे बक्षीस
आदर्शगाव सराटेवडगांवाला मिळवून दिले आहेत.समाजात प्रत्येक व्यक्तीने जन्माला
आल्यानंतर समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो.समाजाचे आपल्यावर ऋण असते.हेच समाजाचे ऋण
प्रत्येकाने निस्वार्थपणे सेवा करून फेडलेच पाहिजे.आदर्शगाव आनंदवाडी,सराटेवडगाव
जलसमृद्ध करण्यासाठी गावक-यांना सोबत घेऊन त्यासाठी २० वर्षापासून प्रयत्न केले.हे
स्वप्न पूर्ण होण्यासाठी सन २०२२ हे वर्ष लागले.सराटेवडगांव,आनंदवाडी दोन्ही गावे
जलसमृद्ध होऊन आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करू लागले.आदर्शगाव आनंदवाडी या छोट्याशा
गावात १९७० साली राम बोडखे यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर
कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात इतिहास विषयाचा प्राध्यापक म्हणून १९९५
पासून सेवेत रुजू झाले.संत गाडगेबाबा महात्मा गांधी आणि अण्णा हजारे हे राम बोडखे
यांचे आदर्श आहेत.सराटेवडगांवात युवकांना एकत्र करून ओढ्यावर वनराई बंधारे,
स्वच्छता अभियान,वृक्षारोपण अशी कामे केले. " खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू
सर्व भावे करू स्वर्गगावा" प्रा.राम बोडखे हे १० वर्षे एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी
म्हणून त्यांनी काम केले. समाजसेवा करण्याची त्यांना सुवर्णसंधी मिळाली.राष्ट्रीय
सेवा योजनेच्या गावातील १० दिवसीय शिबिरामुळे आणि एक दिवसीय शिबिरामुळे गावात अनेक
समाजोपयोगी कामे केली.उदा.वृक्षारोपण,वनराई बंधारा,सीसीटी,तलावाचा गाळ काढणे,
हागणदारी मुक्त गाव व रस्ता दुरुस्ती आदी स्वरूपाची कामे केली.एनएसएस विभागामार्फत
आनंदवाडी हे गाव दत्तक घेतल्याने दोन्ही गावाचा कायापालट झाला.सराटेवडगांव हे
मराठवाड्यातील पहिले हागणदारीमुक्त गाव ठरले.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने येथे
राज्यस्तरीय शिबिर घेतले.संपूर्ण महाराष्ट्रातून २०० विद्यार्थी आले होते.याच
शिबिरामध्ये आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी गावाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले.राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये चांगले काम केल्यामुळे विद्यापीठाने सन २००४ - २००५
तसेच महाराष्ट्र शासनाने सन २००६- २००७ मध्ये उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणुन राम
बोडखे यांंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आहे. सन २००७ मध्ये जलस्वराज विहिरीचे काम
केल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला,जवळच बांधलेल्या बंधार्यामुळे पाच
विहिरींना पाण्याचा फरक पडला आहे. आनंदवाडीमधील जलस्वराज योजनेला जलतज्ञ
राजेंद्रसिंह यांनीसुद्धा भेट दिली.आजही ही नळ योजना आणि सिमेंट बंधारा एकदम
उत्कृष्ट स्वरूपाचा आहे.सराटेवडगाव ,आनंदवाडीमध्ये उत्कृष्ट जलस्वराज
योजना,एनएसएसमुळे गावाचा कायापालट,आनंदवाडी हागणदारी मुक्त गाव या सर्व कामामुळे
ग्रामस्थांनी राम बोडखे यांना सरपंच म्हणून निवडून दिले.सन २००८ मध्ये सरपंच
झाल्यानंतर सराटेवडगाव हे गाव हागणदारी मुक्त केले.त्यामुळे गावाला राष्ट्रपतीच्या
हस्ते पहिला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.दोन्ही गावात ग्राम स्वच्छता अभियान
उत्कृष्ट राबविल्यामुळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हा प्रथम पुरस्कार
मिळाला.गावात वृक्षारोपण आणि संवर्धनामुळे पर्यावरण ग्रामसमृद्ध पुरस्कार मिळाला
अशा प्रकारे गावाला तीन पुरस्कार मिळाले.याच काळात गावात श्रमदानातून पाझर तलावातील
गाळ काढला.डोंगरावर सीसीटीचे काम केले. प्रत्येक वर्षी ओढ्यावर व नदीवर वनराई
बंधारे श्रमदानातून केली जात होती.अशाप्रकारे थोड्याफार प्रमाणात पाणलोटाची काम या
कार्यकाळात पूर्ण केली. सन २०१७ मध्ये पुन्हा राम बोडखे यांची लोकनियुक्त सरपंच
झाली.सरपंच होण्याची त्यांची एकच इच्छा होती, राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजारसारखे
आनंदवाडी, सराटेवडगाव हे जलसमृद्ध गाव करावयाचे होते.राम बोडखे यांंनी पाहिलेले
स्वप्न होते माझेही गाव " एक ना एक दिवस माझे गाव जलसमृद्ध करणारच " हे स्वप्न
पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.याच काळात पाणी फाऊंडेशन अंतर्गत " सत्यमेव
जयते वॉटर कप " स्पर्धा आष्टी तालुक्यात सन २०१८ ला सुरू झाली होती.राम बोडखे गावचे
सरपंच होते.अण्णा हजारे यांच्यावर त्यांची पीएच.डी.झाली होती. याचा त्यांना
स्पर्धेसाठी फायदा झाला. माझे गाव जलसमृद्ध व्हावे यासाठी या स्पर्धेत तन-मन धनाने
काम केले.टिकाऊ खोरे घमेले हातात घेऊन स्वतः सुरुवात केली.आपण जर काम केले तर गाव
काम करील याची मला खात्री होती.८ एप्रिलला रात्री १२ वाजता कामाला समाजप्रबोधनकार
ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु महाराजांच्या हस्ते सुरुवात केली.दिवस रात्र,ऊन
असल्यामुळे श्रमदानाची कामे उन्हात करता येत नव्हती.त्यामुळे रात्री ९ ते १२
यावेळात लाईट लावून श्रमदानाची कामे केली. बांधबंधिस्ती,कंटूर बांध,सीसीटी,
शोषखड्डे अशा प्रकारची कामे रात्री गावातील २०० लोक एकत्र येऊन करत होती.रात्रीच्या
श्रमदानासाठी मोठ्या प्रमाणात युवक, महिलांचा सहभाग होता.ही सर्व कामे तंत्रशुद्ध
पद्धतीने केली.ट्रॅक्टरमधून रात्री डोंगरावर लोकांना घेऊन जायचे.स्पर्धा
कालावधीमध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल तर श्रमदान झाल्यावर तेथेच त्याचा वाढदिवस
साजरा केला जात असे.ग्रामसभा घेऊन त्या दिवसाच्या कामाचा शेवट केला जात असायचा.४५
दिवसात श्रमदानाची ६६५७.२१ घनमीटरचे काम श्रमदानातून झाले झाले.यामध्ये ७ सिमेंट
बंधारे, बांधबंधिस्ती, कंटूर बांध, गॅबियन बंधारा,सीसीटी, एलबीएस आदी कामे
झाली.भारतीय जैन संघटना या संस्थेने पोकलेन मशीन दिल्यामुळे २१ शेततलाव,ओढा
खोलीकरण- रुंदीकरण,डीप सीसीटी असे ७१.७४९.९८ घनमीटरची कामे झाली.यासर्व कामांचे
वॉटर बजेट करण्यात आले.वृक्षारोपण केले. विहीर मोजमाप केले इत्यादी स्वरूपाची कामे
करता आली. माथा ते पायथा स्वरूपाची कामे केल्यानंतर स्पर्धेच्या शेवटच्या
राज्यस्तरीय टीममध्ये आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी
करण्यात आली त्या पाहणी दरम्यान त्यांनी कामाचे कौतुक केले.आनंदवाडी गावाला
राज्यातील तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले.हे बक्षीस २५ लक्ष रुपयाचे होते.
आनंदवाडी गावाचे नाव संपूर्ण देशात झाले.स्पर्धेच्या काळात बनविलेली पाणलोटाची
स्ट्रक्चर पावसाने भरण्याची वाट आम्ही पाहत होतो.चांगला पाऊस झाल्यानंतर ती सर्व
स्ट्रक्चर पूर्ण भरली आणि गाव जलसमृद्ध झाले. आनंदवाडीने बक्षीस जिंकल्यानंतर
सराटेवडगाव ही नक्कीच बक्षीस जिंकू शकेल याची खात्री राम बोडखे होती.स्पर्धेचा
फॉर्म भरून सराटेवडगावचे १० युवक व महिलांना पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षणासाठी
पाठविले.सन २०१९ ची स्पर्धा ही ५० दिवसांची होती.स्पर्धेची सुरुवात ह.भ.प.बद्रीनाथ
महाराज तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आली.८ एप्रिल २०१९ ला रात्री १२ वाजता
श्रमदानाच्या कामाची बांध बंदिस्तिपासून सुरुवात करण्यात आली.सराटेवडगावमध्ये सकाळी
६ ते ९ वाजेपर्यंत ६० युवक श्रमदानाचे काम करत होते.रात्री ३०० युवक महिला ग्रामस्थ
श्रमदानाला येत होते.त्यामुळे सराटेवडगावमध्ये बांधबंधिस्ती,कंटूर
बांध,सीसीटी,छोटा मातीनाला,गॅबियन,चार छोटे सिमेंटचे बंधारे असे एकूण श्रमदानाचे
१०.३७०.९२ घनमीटरचे काम गावात ५० दिवसात झाले.यंत्र कामासाठी आम्हाला
मानवलोक,ज्ञानप्रबोधनी, स्नेहालय यांनी पोकलँड व जेसीपी दिल्या.त्यामुळे १५००
मीटरचे नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करता आले.शेततलाव, डीप सीसीटीचे मोठ्या
प्रमाणात काम केले.नदीच्या खोलीकरणादरम्यान जे बर्म सोडले होते ते ४०० ट्रॅक्टर दगड
वापरून त्याची पिचिंग केली त्यामुळे नदीला कितीही पाणी आले तरी बर्म नदीचे तुटले
नाही असे एकूण ९०.८३९.५० घनमीटरचे पाणलोटाचे काम झाले.हा एक प्रकारे आमच्या गावाचा
इतिहासच घडला होता कारण की,हेच काम राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला करण्यासाठी १५
वर्षे काळ लागला होता ते फक्त ५० दिवसात संपूर्ण गाव एकत्र आल्याने शक्य
झाले.यावर्षीही पुण्याला बालेवाडी येथे निकाल घोषित करण्यात आला.सराटेवडगाव हे गाव
तालुक्यात पहिले तर राज्यातील १६ गावात त्याचा समावेश झाला होता.१० लक्ष रुपयाचे
बक्षीस सराटेवडगावाला मिळाले. दोन्हीही गावात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून व इतरही
सेवाभावी संस्थेकडून आर्थिक सहकार्य मिळाल्यामुळे पाणलोटाचे माथा ते पायथा असे
कधीही न होणारे उत्कृष्ट काम पूर्ण झाले.बीड जिल्ह्यातील एक आदर्श गाव
साकारल्यामुळे आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक चेतन पाटोळे यांनी ५
वर्षासाठी सराटेवडगांव दत्तक घेतले.आमच्या गावाचे १५०० मीटरचे नदी खोलीकरणाचे काम
राहिले होते ते आयसीआयसीआय फाऊंडेशनने दोन वर्षात म्हणजे सन २०२० मध्ये
सराटेवडगावचे ५०० मीटर व आनंदवाडीचे सन २०२१ मध्ये १००० मीटरचे नदीखोलीकरण रुंदीकरण
व वृक्षलागवडीचे काम केले.फाऊंडेशनला ४ लक्ष रुपयाचा लोक वाटा देण्यात आला. नदी
खोलीकरणामुळे गावाचे ९० टक्के पाणलोटाचे काम पूर्ण झाले. सराटेवडगाव, आनंदवाडी
मिळून तीन हजार मीटर (३ कि.मी.) नदीचे खोलीकरण झाले यामुळे गावाचा कायमचा पाण्याचा
प्रश्न मिटला याशिवाय आयसीआयसीआय फाऊंडेशनने वेगवेगळे प्रशिक्षण सेंद्रिय शेती
शेतकऱ्यांना फळांचे वृक्ष वाटप घनवन,शेती पूरक लघुउद्योग प्रशिक्षण इत्यादी
स्वरूपाची कामे सराटेवडगावमध्ये केले. महाराष्ट्रातील पहिले कार्बन न्यूट्रल
व्हिलेज म्हणून गावाची निवड केली.नदी खोलीकरणामुळे १२६ बोरवेल व ५८ विहिरींना तसेच
शेजारील मेहेकरी, रुईटाकळी या गावाची पाणीपातळी वाढली.मार्च महिन्यामध्ये
नदीच्याकडेच्या विहिरी उपसत होत्या परंतु जलसमृद्धचे काम केल्यामुळे नदीच्याकडेच्या
विहिरीचे पाणी मे महिन्यापर्यंतसुद्धा पाणी राहते.अशाप्रकारे गाव पाण्याच्या
बाबतीत स्वयंपूर्ण म्हणजे जलसमृद्ध झाले शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लाखाने वाढ
झाली हे केवळ पाणलोटाचे काम केल्याने शक्य झाले.दोन्ही गावे जलसमृद्ध झाल्यामुळे
बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माझी निवड पुणे येथे केंद्र शासनाच्या सरपंच
कार्यशाळेसाठी केली.संपूर्ण भारतातून १२०० सरपंच आले होते.त्यांना जलसमृद्ध गाव कसे
करायचे याबद्दल मार्गदर्शन केले व केलेल्या कामाची ३.३० मिनिटाची गावाची यशोगाथा
फिल्मद्वारे दाखविली.त्यामुळे गावाचे नाव पुन्हा देश पातळीवर गेले.तेथे प्रमाणपत्र
व स्मृतिचिन्ह देऊन माझा सन्मान केला.सराटेवडगाव,आनंदवाडी गावाचा विकास आयसीआयसीआय
फाउंडेशन,पाणी फाऊंडेशन,इतर सेवाभावी संस्था,ग्रामस्थ,अधिकारी,


एनएसएस विभाग, राम
बोडखे यांना गावांनी सरपंचपद देऊन सेवा करण्याची संधी दिल्यामुळे शक्य
झाले.जलसमृद्ध गाव करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे जीवनात समाजासाठी काहीतरी थोडे
काम करता आले याचे प्रा.राम बोडखे यांना याचे समाधान आहे. सिन्नरचा युवा मित्रचा
राज्यस्तरीय जलयोद्धा पुरस्कार आज प्रा.डाॕ.राम बोडखे यांना प्रदान केला जात आहे
त्यानिमित्ताने झुंजारवार्ता परिवाराच्यावतीने शुभेच्छा
.......
0 टिप्पण्या