आष्टी
जीवनात गुरु हे आईवडिलांनंतरचे अत्यंत पवित्र गुरु आहेत. गुरुजनांचा आयुष्यभर
आदर सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.इंजिनिअर,डॉक्टर, कलेक्टर ,शिक्षक,
प्राध्यापक,शेतकरी, कामगार,आदर्श माता,आदर्श गृहीणी आदिसहविविध क्षेत्रात असलेले
गुनीजण या सर्वांचे मार्गदर्शक हे शिक्षक असतात.या शिक्षकांच्या प्रति आदर करून
वाटचाल केल्यास यश,समाधान आणि ऊर्जा मिळते. माणसाजवळ धन नसले तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेले मन पाहिजे असे सांगत आई-वडिलांनंतरचे दुसरे पवित्र गुरु म्हणजे
शिक्षक! असे भावनिक प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती विजया संत्रे यांनी व्यक्त
केले. आष्टी येथील जि.प. कन्या शाळेतील १९८७- १९८८ मध्ये दहावीच्या या
विद्यार्थिनींच्या आयोजित स्नेहमेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. या
विद्यार्थिनींच्या स्नेहमेलन मिळाव्यात रिमझिम पावसाच्या सरींनी आपला उत्स्फूर्त
सहभाग नोंदवला.'... बालपणीच्या आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत,असंख्य,विविध
रोमांचक घटनाक्रमांना पुन्हा नव्याने आठवणींच्या कल्लोळात बालपणीच्या
वर्गमैत्रिणींचा स्नेह मेळावा आष्टीत अत्यंत स्नेहगंधित आनंदी आणि रिमझिम सरींच्या
सोबतीने


आज शनिवारी आनंदी सुगंधी वातावरणात रंगला.. ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे
यांच्या पत्नी आदर्श शिक्षिका बबीताताई बोडखे , संगीता भोकरे यांच्यासह
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वर्गमैत्रिणींचा स्नेहमेलन मेळावा
गप्पागोष्टींच्या आणि विविध आठवणींच्या माध्यमातून पार पडला.१९८७- १९८८ मध्ये
दहावीच्या या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा ३५ वर्षानंतर यावर्षी उत्साहपूर्ण
वातावरणात संपन्न केला.सरस्वती प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात झाली. आज
सकाळीच ११ वाजता आष्टी येथील कन्या शाळेत महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण
,विदर्भ आणि मराठवाड्यातील वर्गमैत्रिणींनी वेगवेगळ्या क्षेत्रात जीवनाची वाटचाल
करून येथे एकत्र येण्यात आनंद मानला.यावेळी झुलेखाॕ, सारोजनी रोडे,मनिषा
सानप,जयश्री जायभाये, रानुबाई माने,अनिता कटके,निता लांडगे, आंबिका चव्हाण, लता
बनसोडे ,सुनिता यादव, आशा देशमुख, शोभा पानसांडे,आरती कोहीणे, माधुरी
क्षीरसागर,स्वाती मेहेर,बबीता धोंडे,सुवर्णा धोंडे ,रंजना जैन,मनिषा मेहर,वैजंयता
कटारिया , स्वाती जोशी यांंच्यासहा असंख्य माजी विद्यार्थ्यांंनी उपस्थित होत्या.
यावेळी संगीता भोकरे, जुलेखा, रोडे सरोजनी, मनीषा सानप ,जयश्री जायभाये,अंबिका
चव्हाण,सुनिता यादव, आशा देशमुख,माधुरी क्षीरसागर,बबीता बोडखे यांनी आपले मनोगत आणि
शाळेतील आठवणींना उजाळा दिला. आष्टी येथील जि.प. कन्या शाळेच्या सभागृहात हा एकीचा
दरबार हास्यकल्लोळात बुडाला. वर्गमैत्रिणींनी एकमेकांना मिठी मारत तर विनोद हास्य
अन् बालपणीच्या विविध आठवणी एकमेकींशी शेअर करत संवाद साधला.दरम्यान,या
वर्गमैत्रिणींच्या अध्यापिका राहिलेल्या विजया संत्रे मॕडम,मधुकर सोळसे सर या
गुरुवर्यांचे स्वागत सत्कार करण्यात आलेला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खताळ ,
भीमराव गुरव,उत्तम बोडखे,प्रवीण पोकळे, मनोज पोकळे, केंद्रप्रमुख अरुण खुळपे यांनी
अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले. या विद्यार्थिनींच्या स्नेहमेलन मिळाव्यात रिमझिम
पावसाच्या सरींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकीकडे टाळ्यांचा गजर..
बालपणींच्या आठवणींचा उमाळा.. आणि याच सोबत गुरुजनांचे मार्गदर्शन अशा विविध अंगी
विविध स्पर्शी एकत्रीकरणांनी नटलेल्या कार्यक्रमातून हा स्नेह मिलन मेळावा ऐतिहासिक
ठरला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका यांच्यासह उपस्थित होते.यावेळी अनेक माजी
विद्यार्थ्यांंनींनी आपले मनोगत व्यक्त करीत कौटुंबिक परिचय करुन दिला.भविष्यातील
आनंदी यशस्वी जीवनासाठी यावे सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांनी एकत्र बसून
स्नेहभोजनाचा आनंद घेतला. --------------------------------
0 टिप्पण्या