Ticker

6/recent/ticker-posts

मुले सुशिक्षित नाही तर सुसंस्कारी बनवा तरच जीवनाचे अखेरच्या टप्प्यात सुख मिळेल ----ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे

आष्टी (प्रतिनिधी) ध्यानाने मन स्थीर होते.देवाचे आत्मदर्शन होते.आत्मा हा सबका मालीक आहे.देवांचा देव आत्मा देव आहे.ज्ञान,उपासना,कर्म,ध्यान हे जीवनात मिळविले पाहिजे.पालकांनो आपली मुले सुशिक्षित बनवु नका तर सुसंस्कारी बनवा तरच तुम्हांला जीवनाचे अखेरच्या टप्प्यात सुख मिळेल असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. निळकंठ महाराज तावरे यांनी केले.आष्टी तालुक्यातील ईमनगाव येथील आत्मा मालिक ध्यानपीठात आयोजित मासीक कार्यक्रमात ते प्रवचन सेवेत ते बोलत होते.यावेळी आनंद महाराज,शेलार महाराज,रोहिदास काळे महाराज , आण्णासाहेब चौधरी,रमेश तावरे,पत्रकार उत्तम बोडखे,मच्छिंद्र जरांगे,सेवानिवृत्त पीएसआय शाम जासुद,सतीष जरांगे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी तावरे महाराज म्हणाले की,आत्मा या जगातलं एकच सत्य. जगातील संपूर्ण वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी घडतील,पण आत्मा हा चिरकाल टिकेल कारण त्याला आदिही नाही आणि अंतही नाही.अनादि कालापासून आत्म तत्व चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत असेच चालत राहील कारण तो अमर आहे.सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा अस्तित्वात होता म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे. आत्म्यावर प्रेम केले पाहिजे.क्षणभर केलेले आत्मचिंतनसुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याची पूजा केल्यास ती सर्व देवांची पूजा होते.ईश्वरप्राप्तीचा सर्वात साधा,सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आत्मचिंतन कारण ईश्वर आत्म्याच्या स्वरुपात प्रत्येक हृदयात बसलेला आहे.नुसतं रुपाला न पाहता'स्व-रूपाला'पहा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या.आत्मा हा निर्गुण आणि निराकार आहे.त्याला पाहण्यासाठी कोणत्यातरी आकाराची आवश्यकता असते म्हणून कोणत्याही आकारात निराकाराचे ध्यान करावं.आत्म्याला जात,धर्म नसतो.हिंदू, मुस्लिम,शीख,ख्रिश्चन,पारसी आदी सर्वांना आत्मचिंतनाने ईश्वरप्राप्ती होते.भगवान श्रीकृष्ण,मोहम्मद पैगंबर,गुरुनानक, येशूख्रिस्त,भगवान महावीर,भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांनी आत्म्याची ओळख करून घेऊन त्याचे चिंतन केले म्हणूनच ते ईश्वररूप झाले.यम (सत्य),नियम आसन,प्राणायाम (श्वास),प्रत्याहार,
साधना,ध्यान आणि समाधी हे आष्टांग योग आहेत.याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. यावेळी संचलन रमेश तावरे तर अनिल लष्कर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या