Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती कर्मचारी पतसंस्था ही विश्वास आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक ------- सुरेश पवार

आष्टी. आष्टी तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष अत्यंत सचोटी,पारदर्शी, शिस्तबद्ध रीतीने कामकाज करत असलेली पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे.जो लोक सांभाळतो त्याला लोक सांभाळतात आणि जो पैसा सांभाळतो त्याला पैसा सांभाळतो. पावणेदोन कोटी रु या पतसंस्थेचे भागभांडवल आहे.१६ लाख रु पेक्षा जास्त नफा असलेली ही पतसंस्था आहे.४ लाख रु पर्यत कॕश क्रेडीट आहे. तातडी कर्ज मर्यादा ५० हजार रु आहे. तळेकरआप्पा फेब्रुवारीमध्ये चेअरमनपदावरुन सेवानिवृत्त होत आहेत.पंचायत समिती कर्मचारी पतसंस्था सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक ठरली आहे असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी चेअरमन सुरेश पवार यांनी केले. आष्टी येथील पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी चेअरमन पी.ई.तळेकर,व्हाईस चेअरमन राजाभाऊ सायकड,संचालक बबन पडोळे,शरद काळे ,अजय निंबाळकर,आश्रु रेडेकर,शहाराम घोडेस्वार,बापु आंधळे,संदीप देशमुख , श्रीमती ताराबाई पाचे,श्रीमती बेबी बेद्रे,सचिव विलास सोनवणे यांंच्यासह रुपेश निकाळजे ,सुभाष धोंडे ,रोहित सायकड, विष्णु बोडखे,जालींदर गायकवाड ,माणिक शिंदे,मोहन शिंदे,शेख मुस्ताफा,कारले,अनिल तांबारे आदि हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन वरिष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे हे होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की,पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचा जन्मच अत्यंत सुसंस्कारित आणि शिस्तीच्या वातावरणात झालेला आहे.या पतसंस्थेचे चेअरमन तळेकर आप्पा २०१५ पासुन चेअरमनपदावर कार्यरत आहेत.मराठा सेवा संघात सक्रीय नेते असणारे तळेकर यांनी सहकार क्षेत्रातही अत्यंत शिस्तबद्ध चेअरमन म्हणुन काम केले आहे. तळेकर आप्पा आणि त्यांचे संपुर्ण संचालक मंडळाने अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेले आहे.संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे.पुढील संचालक मंडळ अविरोध निवडले जावे अशी आपेक्षा व्यक्त केली.पतसंस्थेने गोरगरीब सभासदांना त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार देण्याचे काम केले आहे. या पतसंस्थेद्वारे सामाजिक उपक्रम देखील राबवले जात असल्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना पतसंस्थेद्वारे अनेक वेळा सहाय्यता करण्यात आलेली आहे.यावेळी चेअरमन पी.ई.तळेकर आप्पा म्हणाले की,पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या २८ व्या.आर्थीक वर्षाचा अहवाल व हिशोबाची पत्रके अंदाजपत्रक पतसंस्थेचा चेअरमन या नात्याने व संचालक मंडळाच्यावतीने सादर केले.मला अत्यंत आनंद होत आहे. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे आष्टी तालुका मर्यादित आहे.पतसंस्थेची स्वतःच्या मालकीची इमारत आहे. इमारतीचे कागदपत्र संस्थेच्या नांवावर आहेत.आष्टी नगरपंचायत हद्दीतील सर्व्हे नं.१३ मध्ये दोन प्लॉट असुन त्यामध्ये संस्थेने इमारत बांधलेली आहे.याचा उपयोग संस्थेच्या कार्यालयासाठी केला जातो.सभासद संख्या १९४ आहे.संस्थेचे भाग भांडवल दि.३१ मार्च २०२३ अखेर रु १ कोटी ७७ लाख ७५ हजार ४८९ रुपये आहे.पतसंस्थेच्या सभासदांना जमा होणाऱ्या भागभांडवलामधुन दिर्घ मुदत कर्ज ,तातडी कर्ज या प्रकारचे कर्ज वाटप करते,अहवाल वर्षाअखेर दिर्घकर्ज १९५१६३६१ रुपये आणि तातडी कर्ज १८५४६८५ रुपये एवढे वाटप, येणे बाकी आहे. अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या १२ सभा झाल्या आहेत.सभेमध्ये संचालक मंडळाने सभासदांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत.पतसंस्थेचा व्यवहार संपुर्णत: बिनचुक करणेसाठी नेटविन सिस्टिम्स अॕण्ड सॉफ्टवेअर प्रा.लि. नाशिक या कंपनीचे असुन त्यानुसार सर्व सभासदांना त्यांच्या खात्याचा खातेउतारा प्रत्येक वर्षी देण्यात आला आहे.अहवाल वर्षा अखेर संस्थेने सर्व मिळुन एकुण १५६५११० रुपये एवढी गुंतवणुक केलेली आहे.सभासदांना वाटप केलेल्या दिर्घ,तातडी कर्जावर द.सा.स.शे.१२ टक्के प्रमाणे आकारणी करत आहोत.पतसंस्थेचे दि.१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षाचे आर्थिक लेखा परिक्षक, प्रमाणित लेखापरीक्षक (सहकार) आर.ए.पोकळे यांनी केलेले आहे. त्यांनी या पतसंस्थेस 'अ' वर्ग दिलेला आहे. पतसंस्थेला अहवाल वर्षात १६ लाख ३७ हजार ०८५ रुपये एवढा नफा झाला आहे.वार्षिक वर्गणी करुन १० मयत सभासद ३ लाख ३० हजार रुपये प्रत्येकी ३० हजार रु मयत सभासदांचे कुंटुंबीयांना आर्थिक मदत पतसंस्थेने दिली आहे.यावर्षी ८ टक्के बोनस वाटप करण्यात येणार असल्याचे चेअरमन तळेकर आप्पा यांनी शेवटी सांगीतले. यावेळी पत्रकार उत्तम बोडखे म्हणाले की, पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अत्यंत शिस्तबद्ध आर्थिक उलाढालीमुळे ग्राहक आणि ठेवीदार यांना संस्थेविषयी आत्मीयता आहे. सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे त्यातूनच या संस्थेची आर्थिक भरभराट होत आहे.१६ लाख रु नफ्यात असणारी ही पतसंस्था आहे आणखी प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.सभेच्या प्रारंभी वार्षीक अहवाल वाचन व प्रस्ताविक पतसंस्थेचे सचिव विलास सोनवणे यांनी केले.सुत्रसंचलन रुपेश निकाळजे यांनी तर उपस्थितांचे आभार सचिव रोहित सायकड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या