आष्टी
आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे
कार्य उत्तम प्रकारे सुरु आहे. शिक्षकांची कामधेनू म्हणूनच ही पतसंस्था ओळखली जाते
असे प्रतिपादन आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांनी व्यक्त
केले. कडा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या मुख्यकार्यालयास त्यांनी भेट दिली
असता त्यांचा सत्कार जेष्ठ सदस्य बबन गिरी यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते
बोलत होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,मनोज यादव उपस्थित होते, यावेळी
पुढे बोलतांना गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे म्हणाले की,शिक्षकांच्या
छोट्यामोठ्या अडचणीला पतसंस्था मदत करते.सभासदांच्या हिताचे निर्णय हे संचालक मंडळ
काम करते.पारदर्शक कारभारामुळे पतसंस्थेची भरभराट होत आहे.शाल,फेटा व श्रीफळ देऊन
मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्योतीराम
देसाई,मनोज यादव,गणेश सोनवणे,जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
0 टिप्पण्या