पंकजाताई मुंडे मी
प्रीतमताई मुंडे हीच्या जागेवर खासदार होणार नाही.मी प्रीतमताईची आई,मोठी बहिण
आहे,मी देणारी आहे,घेणारी नाही. पदे देण्याच्या भूमिकेत मी आहे.मी तिची आई आहे,
प्रीतमताईला डावलुन मी राजकारणात कदापी काम करणार नाही.महाराष्ट्राने, भाजप
पक्षानं,जगाने हे समजून घ्यावं अशा भावनिक भावना व्यक्त करत भाजपाच्या राष्ट्रीय
सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आज पुर्णविराम दिला आहे.
दि.४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या शिव-शक्ती परिक्रमेचा समारोप आज परळीत
झाला,त्यावेळी परळी विधानसभा मतदार संघातील उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्त्यांसमोर
त्या बोलत होत्या. लोकनेत्या पंकजाताई मुंडे म्हणाल्या की,२०१९ मध्ये जेवढी माझी
शक्ती होती. तेवढी २०२४ मध्ये असेल की नाही सांगता येत नाही पण प्रार्थना करते की,
मी जशी शुन्य झाले आणि नंतर स्वतःला घडवले तसं प्रीतमने स्वतःला निर्माण करावं.माझा
तिला आशीर्वाद आहे.शिव-शक्ती परिक्रमेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला,स्वागत
झालं.लोकांचं खूप प्रेम मिळालं.यात कसलंही शक्तिप्रदर्शन नव्हत तर ही शक्तीच
होती,त्याचं प्रदर्शन मांडण्याची गरज नाही. राजकारण, समाजकारण करत असताना सत्व,
तत्व, ममत्व मला महत्वाचे वाटतात,परिक्रमेचा धागा सात्विकतेच्या धाग्याने जोडला
होता.परिक्रमा केवळ परिक्रमा नाही तर पराक्रम ठरणार असा विश्वास पंकजाताई मुंडे
यांंनी व्यक्त केला.मला जग जिंकू द्या.बारीक सारीक गोष्टीत पाडू नका.मला मोठं काम
करू द्या,तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुमची सेवा करत राहील. मोठी स्वप्न बघा, मोठी
स्वप्न जगा,मोठा आशीर्वाद द्या,तो माझ्यासाठी महत्वाचा आहे असं सांगून पंकजाताई
म्हणाल्या, मी जिकंले तर इतिहास घडेल आणि जिंकू नाही दिले तरीही इतिहास घडेल. माझी
भूमिका कधीच अयशस्वी ठरणार नाही.

आता इलेक्शन तोंडावर आलंयं,आता एक एक अंश
व्हायचयं आपल्या हया शक्तीचा.. आपल्याला उज्ज्वल भविष्य घडवायचयं, त्यासाठी पाठिशी
उभं राहून मला आशीर्वाद द्या असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या...
0 टिप्पण्या