Ticker

6/recent/ticker-posts

चिंचाळा येथील आंंदोलनकर्त्यांची प्रकृती खालवली तरी प्रशासनाचे लक्ष नाही छत्रपती क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांची तक्रार*

अंतरवली सराटी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केले आहे.त्या उपोषणाच्या समर्थनात आष्टी तालुक्यामध्ये केळसांगवी, चोभानिमगाव,चिंचाळा,मांडवा,घाटापिंपरी आदि गावांमध्ये अमरण उपोषण सुरु आहे.या आंदोलनाला भेटी दिल्या असता उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याचे लक्षात येत आहे. आंदोलनकर्ते ही गोष्ट मान्य करत नाहीत पण प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.खुंटेफळ याठिकाणी आंदोलनकर्त्याची शुगर पातळी कमी झाल्याचे लक्षात येताच आम्ही आणि काही सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिका-यांनी या आंदोलनकर्त्यास आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असता ते आंदोलन स्थगित झाले.परंतु ही परिस्थिती अन्य ठिकाणी नाही.प्रशासनस्तरावर त्यांची काळजी घेणारी व त्यांच्याशी संवाद साधणारी कोणतीही बाब आढळून येत नाही.
चिंचाळा येथील सरपंच अशोक पोकळे यांंच्यासह दोन जणांची प्रकृती खालावली आहे.यासंदर्भात काही अघटीत घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.अन्यथा या आंदोलनाचे स्वरूप उग्र होऊ शकते असे छत्रपती क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांनी आष्टीचे तहसिलदारांना निवेदन दिले.या निवेदनावर स्वप्निल थेटे,भीमराज झगडे , किसन जाधव,जगन्नाथ वाघ,अविनाश सोनवणे,शेख अब्दुलभाई यांंच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या