आष्टी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील ग्रामस्थांनी पाच दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे,


माजी आमदार भीमराव धोंडे ,युवा नेते जयदत्त धस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्याला पाठिंबा दिला आहे.
आष्टी तालुक्यातील बेलगांव येथील मराठा समाज पेटून उठला आहे. पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.यामध्ये भाऊसाहेब कोंडीबा पोकळे, ज्ञानेश्वर पद्माकर पोकळे,मारुती सरोदे, आबासाहेब अशोक पोकळे,शिवम संजय पोकळे या उपोषणकर्त्याचा समावेश आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,
माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे,माजी उपसरपंच संजय पोकळे,सरपंच तात्यासाहेब शिंदे,प्रविण वारे,उपसरपंच सतिष पोकळे,सेवानिवृत्त प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे,पत्रकार शरद रेडेकर,पत्रकार प्रविण पोकळे,नानासाहेब पोकळे,गणेश पोकळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बेलगाव येथील युवक महिला व नागरिक पेटून उठले असून आमरण उपोषणा अगोदर जवळपास एक तास आष्टी -डोईठाण मार्गावर चक्काजाम आंदोलन करून गावामध्ये वेगवेगळे आंदोलने करून रान पेटवले आहे.या आमरण उपोषणाला तहसीलदार प्रमोद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी,मंडळ अधिकारी शरद शिंदे,धामणगाव उपकेंद्राचे डॉ.अनिल अरबे व त्यांची टीम यांची वेळोवेळी तपासणी करत आहेत.या आमरण उपोषणास गावातील मराठा समाजासह सर्व ओबीसी समाजाचा पाठिंबा दर्शविला आहे.
0 टिप्पण्या