
आष्टी
राजकारणात
निष्ठेपेक्षा निसटानिसटीला जास्त महत्व आलेले आहे. आपले काम होईपर्यंतच नेता आपल्या
कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्ता आपल्या नेत्याला निष्ठा दाखवत असतो.काम झाल्यानंतर
फक्त निष्ठे ऐवजी निसटा निसटी पाहवयास मिळते हे वास्तव आहे परंतु याला जुन्या
पिढीतील कार्यकर्ते आणि नेते अपवाद आहेत.आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत
निष्ठेने वागणारा नेता म्हणुन नेहमीच आष्टीविधानसभा मतदार संघाचे चारवेळा विधान
सभेत नेतृत्व केलेले माजी आ.भीमराव धोंडे यांच्याकडे पाहिले जाते.वेळ मिळेल तेव्हा
ते अशा कार्यकर्त्यांसोबत काही वेळ घालुन त्यांच्या आरोग्य विषयी विचारपूस करून
योग्य मदत करण्याचा प्रयत्न करतात हे अनेकदा दिसले आहे.माजी आ.भीमराव धोंडे यांनी
नुकतीच आष्टी तालुक्यातील कानडी बेलगांव येथील ज्ञानदेवमुकादम खिळे (वय ८५) आणि
बलभीमराव खिळे (वय ९६) या दोघा वयोवृद्ध कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची
ख्यालीखुशाली विचारली. माजी आ. भीमराव धोंडे यांच्या ऐन राजकिय जडणघडणीच्या वेळी हे
दोन कार्यकर्ते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या पाठीमागे पुर्ण ताकदीने आणि निष्ठेने
उभे राहिले.नेता म्हणुन पुढे येण्यासाठी त्यांचे मागे निष्ठेने किती
कार्यकर्त्यांसोबत आहेत हे महत्वाचे असते.असेच काम अनेक कार्यकर्त्यांनी धोंडे
यांच्यामागे उभे राहून केले आहे.अशा कार्यकर्त्यांना देखील माजी आ.धोंडे कधी
विसरत नाहीत.घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना काळजी घेण्याबाबत
नेहमीच सुचना देतात.नुकतीच त्यांनी कानडी बेलगांव येथील ज्ञानदेव मुकादम खिळे (वय
८५) आणि बलभीमराव खिळे (वय ९६) या दोघा वयोवृद्ध कार्यकर्त्यांची त्यांच्या घरी
जाऊन भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन केले.भीमराव धोंडे यांंच्या राजकीय जीवनात या
दोघांचा मोठा सहाभाग आणि त्याग आहे. यावेळी मोरेआबा,गव्हाणे, संजय खिळे, बापूराव
सर, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या