
आष्टी
छत्रपती शिवाजी महाराजांवर बालवयात राजमाता जिजाऊंनी संस्कार
केले म्हणून ते घडले तसे तरुणांनी आपले जीवन घडवावे प्रगतीसाठी ज्ञान प्राप्त
करावे,व्यवसायाकडे वळावे,जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिकपणा ठेवावे तरच यश मिळते.
तरुणांनो तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल असे प्रतिपादन
कीर्तनकार ह.भ.प.प्रा.विजय राजपुरे यांनी केले.आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव येथे
कानिफनाथ महाराज नवनाथ ग्रंथ पारायण आणि भंडारा कार्यक्रमानिमित्त अयोध्या आढाव
यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार अक्षय विधाते आणि
अमोल देशमुख यांनी आयोजित केलेल्या किर्तनसेवेत प्रा.विजय राजपुरे सर बोलत होते.
यावेळी ह.भ.प.विजय राजपुरे यांनी "धर्माचे पालन करणे पाखंड खंडण" या अभंगाचे
सुंदर निरुपन केले.वाढलेली बेरोजगारी, तरुणांमध्ये वाढलेले व्यसनाधिनता हे घातक
आहे.व्यसन करु नका,आई वडीलांची सेवा करा,कोणत्याही क्षेत्रात जा.तिथे पूर्ण वेळ
देऊन कष्ट करण्याची तयारी ठेवा.पात्रता सिध्द करा जग तुमच्यासमोर झुकेल.संगतीचे
परिणाम कसे होतात ते कीर्तनातून सांगितले. मी किर्तनकार आहे.तोसुध्दा श्री क्षेत्र
सुदर्शन आश्रम शिंदेवाडी येथीलगडाचे महंत सुदर्शन महाराज यांच्या मुळेच..ज्याला
सुख पाहिजे त्याने संगत संतांची करावी असे आवाहन तरुणांना केले.यावेळी मोठ्या
संख्येने भाविक उपस्थित होते.या किर्तन सेवेचा माजी सरपंच जालिंदर गायकवाड,पत्रकार
संतोष नागरगोजे,समीर शेख,भाऊसाहेब ननवरे,नामदेव शिंदे,उत्तम नागरगोजे, कांतीलाल
सांगळे,गोरख नागरगोजे,परमेश्वर गावडे,सुखदेव देशमुख,हनुमान गायकवाड,गणेश
टकले,उद्धव खांडवे, परमेश्वर देशमुख,दिनेश देशमुख, अंबादास बांगर आदी व सर्व
क-हेवडगाव,क-हेवाडीचे भजनी मंडळ आणि ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या