Ticker

6/recent/ticker-posts

सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कवी हरीष हातवटे सन्मानीत....

आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज येथील पदवीधर शिक्षक कवी हरीष नवनाथ हातवटे हे मराठी विषयात प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेकडून आ.सुरेश धस,आ. बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,बीड जि.प.चे माजी सदस्य बीड उध्दवबापु दरेकर,शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांंच्या हस्ते त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.यावेळी माजी सभापती युवराज पाटील,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे, कडा कृ.ऊ.बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे,व्हाईस चेअरमन सुभाष भादवे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, माजी चेअरमन सुरेश पवार,पत्रकार संतोष दाणी,केंद्रप्रमुख सुनिता उगले,
मुख्याध्यापक हिरामण पोकळे,अरूण खुळपे,अल्ताफ शेख,सचिन वारंगळे,नितीन सोनटक्के,श्रीमती पवार,बोंद्रे, तावरे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या